टी-सीरीजचे मालक भुषण कुमार यांची चुलत बहीण व अभिनेते कृष्ण कुमार यांची लेक तिशा कुमार (Tisha Kumar Death) हिचे कर्करोगामुळे निधन झाले. १८ जुलैला तिशाचा मृत्यू झाला आणि चार दिवसानंतर २२ जुलैला तिच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्यसंस्काराला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आले होते. यावेळी अभिनेता विंदू दारा सिंगदेखील (Vindu Dara Singh) तिशाला अखेरचा निरोप देण्यासाठी आला होता, पण त्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

तिशा कुमारचे अवघ्या २१ व्या वर्षी निधन झाले. तिच्या निधनाने तिचे वडील कृष्ण कुमार व आई तान्या सिंह यांच्यासह भुषण कुमार व दिव्या खोसला कुमारला मोठा धक्का बसला आहे. तिच्या आई-वडिलांना तर सांभाळणं कठीण झालं होतं, अशी त्यांची अवस्था झाली होती. याच दरम्यान तिशाच्या अंत्यसंस्काराला विंदू दारा सिंग हसत पोहोचला, त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Video: चार दिवसांनी तिशा कुमारवर अंत्यसंस्कार, आई-वडिलांना अश्रू अनावर; रितेश देशमुखने वाहिली श्रद्धांजली

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

स्मशानभूमीतून बाहेर येतानाचा हा व्हिडीओ आहे. यात विंदू व आणखी एक जण आहे. विंदूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि तो हसताना दिसतोय. फोटो व व्हिडीओ काढले जात आहेत, हे लक्षात येताच विंदू हसणं थांबवताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ वूम्पला या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विंदू दारा सिंगला चांगलंच सुनावलं आहे.

“अंबानींच्या लग्नावर टीका करणारे तुम्ही कोण?” पाकिस्तानींना त्यांच्याच अभिनेत्याने सुनावलं; म्हणाला, “त्यांच्या पैशांवर…”

विंदू दारा सिंगवर भडकले नेटकरी

‘हसतोय काय, लग्न आहे का?’ ‘या लोकांचं काय चाललंय असे हसत येतायत जणू पार्टीला आले आहेत, या सेलिब्रिटींना लाज वाटायला हवी,’ ‘कोणाच्या तरी लाडक्या मुलीच्या मृत्यूचा हसून तमाशा बनवून नका,’ ‘तुम्ही कुणाचं दुःख समजू शकत नसाल तर किमान पापाराझी आहेत म्हणून तरी दुःख व्यक्त करा,’ ‘मृत्यूचा तमाशा,’ अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

vindu dara singh troll
विंदू दारा सिंगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स

जर्मनीत झाले तिशाचे निधन

तिशा बऱ्याच काळापासून कर्करोगाशी लढा देत होती. आधी तिच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले पण तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला जर्मनीला नेण्यात आलं. तिथेच उपचारादरम्यान तिशाचे निधन झाले. तिशावर रविवारी (२१ जुलै रोजी) अंत्यसंस्कार केले जाणार होणार होते, परंतु मुसळधार पावसामुळे तिचे पार्थिव घेऊन येणारे विमान वेळेत पोहोचू शकले नाही. त्यामुळे सोमवारी तिला अखेरचा निरोप देण्यात आला.