७० वर्षांचे निर्माते विधु विनोद चोप्रा आजही तितक्याच आत्मियतेने मनोरंजनसृष्टीत काम करतात. कित्येक सुपरहीट चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे विधु विनोद चोप्रा यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विधु विनोद हे आता ‘१२ वी फेल’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट लेखक अनुराग पाठक यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या लोकप्रिय कादंबरीवरुन प्रेरित असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर बेतलेला आहे, पण ‘१२वी फेल’ हा बायोपिक नक्की नाही. खऱ्या घटनांपासून प्रेरित असलेला हा एक व्यावसायिक चित्रपट असणार आहे. शिवाय ‘१२वी फेल’ हा पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण नवी दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात झाले आहे. या परिसरात कित्येक नोकरशहांच्या पिढ्यान पिढ्या जन्मल्या आहेत.

Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
zendaya tom holland engaged
‘स्पायडरमॅन’ फेम अभिनेता टॉम हॉलंड आणि अभिनेत्री झेंडाया यांनी उरकला साखरपुडा? ‘त्या’ अंगठीमुळे चर्चांना उधाण
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!
sachin pilgaonkar presents this international marathi film
“अमेरिकेतील मराठी लोकांनी…”, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाची प्रस्तुती करणार सचिन पिळगांवकर; म्हणाले…
anurag kashyap on kennedy not released
जगभरात गाजलेला ‘केनेडी’ सिनेमा का प्रदर्शित झाला नाही? अनुराग कश्यप नाराजी व्यक्त करत म्हणाला….

चित्रपटाबद्दल बोलताना विधु विनोद चोप्रा म्हणाले, “जर प्रामाणिक व्यक्ती मोठ्या पदावर असेल तर तो खरोखर बदल घडवू शकतो. या चित्रपटाची कथा लिहिताना मी बऱ्याच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलो. जर या चित्रपटातून १० अधिकाऱ्यांना किंवा १० विद्यार्थ्यांनाही प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली तर माझा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन.”

आणखी वाचा : KBC 14 : विवाहित पुरुषांना अमिताभ बच्चन यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले “बायको सांगेल ते निमूटपणे…”

विधु विनोद चोप्रा यांच्या या चित्रपटात विक्रांत मॅसी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘१२वी फेल’चे पहिले शेड्यूल चंबळमध्ये पूर्ण झाले असून याचे पुढचे चित्रीकरण दिल्लीत सुरू आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधु विनोद चोप्रा यांच्या ‘शिकारा’ या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

Story img Loader