कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२२मध्ये प्रदर्शित झालेला कार्तिक व कियारा अडवाणीचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर गेल्यावर्षी २०२३मध्ये ‘भूल भुलैया ३’ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून या चित्रपटाविषयी चर्चा रंगली आहे. अनीस बज्मी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अशात कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात कोण मंजुलिका असणार आणि कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता कार्तिक आर्यनने काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “मंजुलिका भूल भुलैयाच्या दुनियेत परत येत आहे. मी विद्या बालन हिचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘भूल भुलैया ३’ यंदाच्या दिवाळीत धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे,” असं कॅप्शन लिहित कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विद्या बालन आणि कार्तिक ‘मेरे ढोलना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: “कलाकार जुने आहेत पण…”, शिवानी बावकर व आकाश नलावडेच्या नव्या मालिकेबद्दल नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

कार्तिक आर्यनची ही पोस्ट पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. ‘अक्षय कुमारला देखील परत घ्या’, ‘मी खूप उत्सुक आहे’, ‘प्रतीक्षा करू शकत नाही’, अशा अनेक प्रतिक्रिया कार्तिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: चार महिन्यांनंतर राहुल वैद्य व दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “बाबाची कार्बन कॉपी…”

दरम्यान, २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया’मध्ये अक्षय कुमारसह विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. पण चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अक्षयची जागा कार्तिक आर्यनने घेतली. तर विद्या बालन दिसलीच नाही. ‘भूल भुलैया २’मध्ये तब्बू व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकल्या. आता ‘भूल भुलैया ३’मध्ये विद्या बालनची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan comeback as manjulika in kartik aaryan film bhool bhulaiyaa 3 and this film will released on diwali pps