सध्या बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’मध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. दोन्ही सिनेमांनी २०० कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. ‘भूल भुलैया ३’ सिनेमात कार्तिक आर्यन बरोबर बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील त्या दोघींच्या डान्सचं कौतुक होत आहे. माधुरी दीक्षित ही विद्याची आवडती अभिनेत्री आहे असं तिने अनेकदा सांगितलं आहे. एका मुलाखतीत विद्या बालनला माधुरी दीक्षित व्यतिरिक्त तिच्या आवडत्या अभिनेत्री कोण आहे, हा प्रश्न विचारण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या एका मुलाखतीत विद्या बालनला तिच्या आवडत्या अभिनेत्री कोणत्या असून त्यापैकी कोणाबरोबर तिला भविष्यात काम करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विद्याने सांगितलं की, या संदर्भात तिने फार विचार केला नव्हता, पण श्रीदेवींबद्दल तिला विशेष आदर असल्याचं तिने नमूद केलं.

हेही वाचा…‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या अद्वितीय अभिनयाने प्रेक्षकांवर अविस्मरणीय ठसा उमटवला आहे. त्यांच्या बहुआयामी भूमिकांमुळेच त्या प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. श्रीदेवींच्या अभिनय कौशल्याची स्तुती करताना अभिनेत्री विद्या बालनने एक इच्छा व्यक्त केली आहे.

विद्या म्हणाली, “मला श्रीदेवींना ॲक्शन भूमिकेत बघायला आवडलं असतं. त्या अत्यंत समर्पित अभिनेत्री होत्या. असं काही नाही जे श्रीदेवी करू शकत नव्हत्या. पण, दुर्दैवाने आता तसं शक्य होणार नाही.”

हेही वाचा…सैफ अली खानने २१व्या वर्षी केले होते लग्न, आई-वडिलांनाही दिली नव्हती कल्पना; किस्सा सांगत म्हणालेला, “पहिलीच डेट आणि…”

श्रीदेवींसारख्या अप्रतिम अभिनेत्रीला ॲक्शन भूमिकांमध्ये बघणं हा एक वेगळा अनुभव असता, असं विद्याचं मत आहे. ती म्हणते की, अशा कलाकारांबरोबर पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली असती तर ते तिच्यासाठी एक मोठं यश असतं. तसंच तिने पुढे शबाना आझमी, वहिदा रेहमान, रेखा यांच्याबरोबरही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. विद्याने आजवर ‘परिणीता’, ‘कहाणी’, ‘कहाणी २’, ‘द डर्टी पिक्चर’या सिनेमांतून सशक्त अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘द डर्टी पिक्चर’साठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा…घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”

‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलवर विद्या काय म्हणाली ?

‘द डर्टी पिक्चर’ स्वीकारण्याचा निर्णय विद्यासाठी फायदेशीर ठरला आणि विद्या बालन तिच्या ऑन-स्क्रीन विविधतेसाठी प्रसिद्ध झाली. ‘गालट्टा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विद्याला विचारण्यात आलं की, तिला ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलमध्ये काम करायला आवडेल का, त्यावर ती म्हणाली, “हो, मला नक्कीच आवडेल. मी पूर्णपणे तयार आहे. अशी भूमिका करून खूप काळ झाला आहे, मला पुन्हा एकदा अशी भूमिका करायला मिळाली तर आनंदच होईल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan expressed her wish that she would have liked to see sridevi in an action role psg