कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा रंगला. तर काल मुंबईत यांच्या लग्नाचं जंगी रिसेप्शन झालं. त्या रिसेप्शनला विद्या बालननेही हजेरी लावली. परंतु रिसेप्शनला परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे.

सिद्धार्थ-किराच्या काल मुंबईत पार पडलेल्या रिसेप्शनला अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली. या रिसेप्शनला नीतू कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, काजोल, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी,अनुपम खेर, अर्पिता-आयुष शर्मा, दिशा पाटनी, वरुण धवन, करिना कपूर खान, करण जोहर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचबरोबर या रिसेप्शनला अभिनेत्री विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर आली होती. कोणत्याही कार्यक्रमाला साडी नेसणारी विद्या काल एका घागऱ्यामध्ये दिसली. आता त्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

आणखी वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला विद्या बालनने काळ्या रंगाचा घागरा परिधान केला होता. या घागऱ्याचा टॉप तिच्या कमरेपर्यंत होता तर घागऱ्याला भरपूर घेरही होता. या ड्रेस मध्ये चालताना ती अडखळत होती. या ड्रेसमध्ये ती अजिबातच कम्फर्टेबल दिसली नाही. त्यामुळे तिचं चाळणंही बदललं होतं. आता तिच्या या व्हिडीओवर नेतकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : “विद्या बालनने मला किस…” पूजा भट्टने मौन तोडत केला मोठा खुलासा

एका नेटकऱ्याने लिहिलं, “कोणत्याही समारंभाला विद्या साडी नेसून येते. आज हिला काय झालं?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही ज्या प्रकारे चालतीये त्यावरून ती प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे.” आणखी एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं, “त्या ड्रेसमध्ये ती अजिबात कम्फर्टेबल नाहीये.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “वाईट फॅशन सेन्सचा पुरस्कार जातोय विद्या बालनला…” त्यामुळे आता तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Story img Loader