अभिनेत्री विद्या बालनने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. पण त्याचबरोबरीने विद्याच्या सौंदर्याचेही सगळेच जण तोंडभरुन कौतुक करतात. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. शिवाय तिचे विविध लूक चर्चेचा विषय ठरत असतात. आताही तिच्या एका फोटोशूटमुळे नेटकऱ्यांनी भूवया उंचावल्या आहेत.
विद्या विविध लूकमधील तिचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. बऱ्याचदा बोल्ड लूकवरुन तिला ट्रोलही करण्यात येतं. आताही असंच काहीसं घडताना दिसत आहे. सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर फोटोशूटसाठी विद्याने वेगवेगळ्या पोझ दिल्या. पण यावेळी तिच्या न्यूड फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…
विद्याने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर फोटोशूटसाठी न्यूड पोझ दिल्या. या फोटोंमध्ये विद्याच्या एका हातात वर्तमानपत्र दिसत आहे. तर दुसऱ्या हातात एक कप आहे. शिवाय तिने गॉगलही लावलेला यामध्ये दिसत आहे. विद्याने न्यूड होत केलेलं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
विद्याचं हे न्यूड फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेहमी टॉयलेटमध्ये मी अशीच पोझ देतो, विद्याची कमाल, असे कलाकार कोणाचे आदर्श असू शकत नाहीत, द डर्टी चित्रपटाची आठवण आली, हे तुला शोभतं का? अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही जणं हा फोटो जुना असल्याचं म्हणत आहेत.