यंदाच्या दिवाळीपासून बॉलिवूडमध्ये पार्टीचा माहोल पाहायला मिळत आहे. लग्न समारंभ ते चित्रपटाची सक्सेस पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. नुकतंच निर्माती गुनीत मोंगा हिच्या प्री-वेडिंग पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पार्टीत मोठमोठे उद्योगपती तसेच अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली.

नेहमीप्रमाणेच बॉलिवूड स्टार्स त्यांच्या ग्लॅमरस अवतारात आपल्याला बघायला मिळाले. करण जोहर, विशाल भारद्वाज, नेहा धूपिया, एकता कपूर, सोनाली बेंद्रे या दिग्गज कलाकारांनी पार्टीत हजेरी लावली. यांच्याबरोबरच ‘उह ला ला’ गर्ल विद्या बालननेही या सोहळ्याला हजेरी लावली. विद्या तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर रेड कारपेटवर दिसली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा

आणखी वाचा : ‘कांतारा’ बघून हृतिक रोशन भारावला, ट्वीट करत रिषभ शेट्टीचं केलं तोंडभरून कौतुक; म्हणाला…

सवयीप्रमाणेच विद्याने याठिकाणीही ग्लॅमरस अशी साडी परिधान केली होती. लाल रंगाच्या डिझायनर साडीमध्ये विद्या चांगलीच उठून दिसत होती, पण नेमकं पार्टीत शिरताना तिच्याबरोबर एक प्रसंग घडला. विद्या सेक्युरिटीच्या इथून अंत येणार तितक्यात बाहेर जाणाऱ्या एका व्यक्तीच्या हातामुळे विद्याचा पदर सुटला. विद्याने कसंबसं परिस्थिती निभावून नेली, पण विद्याचा पोटाचा भाग यामुळे दिसू लागला. लगेच विद्याने पदर सावरत पाहुण्यांना भेटू लागली. विद्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओखाली लोकांनी कॉमेंट करत विद्यालाच ट्रोल केलं आहे. विद्या जाडी झाल्याचं कित्येकांनी कॉमेंट मध्ये लिहिलं आहे. एका युझरने “ही नशेत आहे” असं कॉमेंट करत विद्यावर निशाणा साधला आहे. विद्या तिच्या साडीमधील वेगवेगळ्या लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. विद्याने नुकतंच प्राइम व्हिडिओच्या ‘जलसा’ या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती.

Story img Loader