मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. वयाच्या ४९ व्या वर्षीही ती एकदम फिट आहे. तिचे जिमला जातानाचे लूक्स, डान्स, दैनंदिन स्टाइल याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, मलायका आताच नाही तर कॉलेजमध्येही एवढीच लोकप्रिय असल्याचा खुलासा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘जवान’च्या ट्रेलरमधील ‘तो’ सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला प्रभासचा ‘बाहुबली’; नेमकं कनेक्शन काय?, पाहा व्हायरल फोटो

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने नुकतीच ‘नीयत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कर्ली टेल्स’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी विद्याने तिच्या कॉजेल आणि शालेय जीवनातील अनेक किस्से सांगितले. विद्या बालन आणि मलयका अरोरा बालपणी मुंबईच्या चेंबूर परिसरात राहायच्या. याविषयी सांगताना विद्या म्हणाली, “मलायका आणि मी एकाच परिसरात राहायचो पण, आमच्या दोघींच्या शाळा वेगवेगळ्या होत्या. चेंबूरमध्ये अनेक अभिनेत्रींचे बालपण गेले आहे, त्यापैकी काही आज सुपरस्टार आहेत. माझ्याच शाळेत शिल्पा शेट्टी सुद्धा होती. तेव्हा ती उत्तम बास्केट बॉल खेळायची.”

हेही वाचा : Jawan Prevue: “मैं पुण्य हूँ या पाप?”, शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर रिलीज; दीपिका, नयनतारासह झळकणार ‘हे’ कलाकार

विद्या बालन मलायकाच्या कॉलेजच्या दिवसांबाबत सांगताना म्हणाली, “मलायका कॉलेजला असताना फ्रेंच क्लासला जायची. आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्याने ती घरातून निघाली की, माझ्या घरासमोरच्या रस्त्याने पुढे जायची. त्यावेळी काही मुलं तासन् तास तिची फक्त एक झलक पाहण्यासाठी थांबून राहायचे. तिची वाट पाहत असेच उभे राहायचे, हे मी स्वत: पाहिले आहे. तिची ही क्रेझ आजही कमी झालेली नाही.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपट YouTube वर झाला लीक, काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

दरम्यान, मलायका अरोराने १९९८ मध्ये अरबाज खानशी लग्न केले. दोघांनी लग्नानंतर बरीच वर्ष एकत्र संसार केला त्यानंतर २०१७ मध्ये अरबाज-मलायकाचा घटस्फोट झाला. सध्या मलायका बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan recounts malaika arora college days memories sva 00