विद्या बालनच्या करिअरच्या सुरुवातीला तिला ‘परिणीता’, ‘भूल भुलैय्या’ या सिनेमांनी एक वेगळी ओळख मिळवून दिली. विद्या आता ‘भूल भुलैय्या ३’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान तिने एका मुलाखतीत तिच्या करिअरमध्ये तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमावर आणि त्याच्या सिक्वेलवर भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच मुलाखतीत विद्याने ‘द डर्टी पिक्चर’ ची ऑफर घेऊन जेव्हा दिग्दर्शक मिलन लुथरिया तिच्याकडे आला तेव्हा तिने हा सिनेमा लगेच का स्वीकारला? लोकांनी तिला सिनेमा स्वीकारण्याबाबत दिलेल्या सल्ल्यावर भाष्य केलं.

हेही वाचा…“ही कुठल्या अँगलने हिरोईन दिसते” असं म्हणत निर्मात्याने विद्या बालनचा केला होता अपमान, किस्सा सांगत म्हणाली, “सहा महिने…”

‘गालट्टा इंडिया’ या माध्यमाशी संवाद साधताना विद्या बालन म्हणाली की, तिला सुरुवातीपासूनच ‘द डर्टी पिक्चर’ करण्याची इच्छा होती. तिच्या आजूबाजूच्या काही लोकांनी तिला ही भूमिका नीट विचार करून स्वीकारण्याचा सल्ला दिला होता, परंतु तिचा निर्णय ठाम होता.

विद्या म्हणाली, “मला अभिनयाची प्रचंड भूक आहे. जेव्हा मिलन लुथरिया मला हा चित्रपट ऑफर करायला आला, तेव्हा मी लगेच होकार दिला. अशा प्रकारच्या भूमिकांसाठी माझा विचार केला जात नव्हता, पण हा सिनेमा माझ्याकडे आला आणि माझ्या करिअरमधील सर्वोत्तम सिनेमा मला मिळाला.”

विद्या बालनने पुढे सांगितलं, “काही लोकांनी मला सल्ला देताना म्हटलं की, ‘तुझी इमेज वेगळी आहे’ पण मी म्हणाले, ‘कसली इमेज? मी नुकतंच करिअर सुरू केलं आहे. मला माझ्या इमेजने एकाच प्रकारच्या भूमिकांसाठी मर्यादित राहायचं नाहीये.”

हेही वाचा…‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला दिली होती धमकी; म्हणाला, “मी मोठा तमाशा….”

‘हम पाच’फेम अभिनेत्रीने लोकांच्या मतांकडे फारसं लक्ष न देता विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याचं ठरवलं. ती म्हणाली की, ती ‘द डर्टी पिक्चर’ मधील रेश्मा ही भूमिका साकारताना अजिबात घाबरली नव्हती; उलट ती अशा संधीची वाट पाहत होती. विद्या म्हणाली की, “ही भूमिका मला मिळाली आणि मी ती दोन्ही हातांनी स्वीकारली.”

‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलवर विद्या काय म्हणाली ?

‘द डर्टी पिक्चर’ स्वीकारण्याचा निर्णय विद्यासाठी फायदेशीर ठरला आणि विद्या बालन तिच्या ऑन-स्क्रीन विविधतेसाठी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत जेव्हा तिला विचारण्यात आलं की, तिला ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलमध्ये काम करायला आवडेल का, त्यावर ती म्हणाली, “हो, मला नक्कीच आवडेल. मी पूर्णपणे तयार आहे. अशी भूमिका करून खूप काळ झाला आहे, मला पुन्हा एकदा अशी भूमिका करायला मिळाली तर आनंदच होईल.”

हेही वाचा…धर्मेंद्र यांनी ‘या’ कारणामुळे दिला होता हेमा मालिनी यांच्याबरोबर काम करण्यास नकार, खुद्द ड्रीम गर्लनेच केला खुलासा…

२०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित होता. यात विद्या बालन, तुषार कपूर, नसीरुद्दीन शाह यांसारख्या अभिनेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan reveals why she accepted the dirty picture and discusses sequel possibility psg