आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर विद्या बालनने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. टीव्हीपासून सुरुवात करणारी विद्या बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्ये साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि विद्याला त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विद्याला एक व्यसन जडलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द डर्टी पिक्चर’नंतर विद्याला धूम्रपान करायची सवय लागली होती. तिने ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. सुरुवातीला ती ऑनस्क्रीन सिगारेट ओढायला तयार नव्हती, पण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला सिगारेटचं व्यसन जडलं, असं तिने सांगितलं आहे.

“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”

विद्याला जडलं सिगारेटचं व्यसन

विद्या म्हणाली, “या चित्रपटाआधी मी धूम्रपान केलं होतं, मला ते कसं करायचं हे माहित होतं, पण मी धूम्रपान करायचे नाही. पण एखादी भूमिका करताना तुम्ही धूम्रपान करण्याची नक्कल करू शकत नाही. आपल्याकडे धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांबद्दल एक विशिष्ट समज आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर तो संकोच असून चालणार नव्हतं. आता महिलांबद्दलचा हा समज खूप कमी झालाय, पण आधी तो खूप होता. ‘द डर्टी पिक्चर’ नंतर सिगारेटचं व्यसन जडलं आणि मी रोज दोन ते तीन सिगारेट ओढत असे,” असंही विद्याने नमूद केलं.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

विद्या बालनला धूम्रपान करायला आवडतं

अजूनही सिगारेट ओढतेस का? असं विचारल्यावर विद्या बालन म्हणाली, “नाही, मला वाटत नाही की मी हे कॅमेऱ्यावर सांगायला पाहिजे, पण मला धूम्रपान करायला खूप आवडतं. जर कोणी म्हटलं की सिगारेट ओढण्याचं कोणतंही नुकसान नाही तर मी ‘स्मोकर’ असते. मला सिगारेटच्या धुराचा वास खूप आवडतो. मी कॉलेजला असताना बस स्टॉपवर धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या शेजारी बसायचे.”

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

दरम्यान, विद्या बालनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास १९ एप्रिलला तिचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात तिच्यासह प्रतीक गांधी व इलियाना डिक्रुझ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan says i was addicted to smoking after the dirty picture she loves cigarettes hrc