९० च्या दशकापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या चर्चेत आहे. बंगाली चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमे दिले. विद्याचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी विद्या अभिनय क्षेत्रासह तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्या बालन अनेकदा मराठी गाण्यांवर थिरकताना दिसते आणि रील्स शेअर करताना दिसते. गेल्या काही महिन्यांपासून ‘भाडिपा’ या यूट्यूब चॅनेलचं ‘अतिशय युनिक आळस’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय. इफ्लूएंसर्ससह अनेक कलाकारदेखील या गाण्यावर रील्स करताना दिसतायत. अदा शर्मानेदेखील या गाण्यावर व्हिडीओ केला होता. आता बॉलीवूडची स्टार विद्या बालन हिनेदेखील हा ट्रेंड फॉलो करत या गाण्यावर रील शेअर केली आहे.

हेही वाचा… टँक टॉप आणि शॉर्ट्सवर ‘या’ अभिनेत्रीने केला ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले, “साडी नेसायची…”

विद्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विद्याने तिच्या बेडवरच बनवला आहे. गाण्याचे बोल बोलत आणि सहजसुंदर अभिनय करत विद्याने ही रील शेअर केली आहे. या व्हिडीओसाठी विद्याने अगदी ग्लॅमरस लूक तयार केला आहे. लाल रंगाची लिपस्टिक, मिनिमल मेकअप, स्लीक हेअरस्टाईल याची निवड विद्याने या व्हिडीओसाठी केली आहे. तसंच रोज गोल्ड रंगाचा सॅटिन रोबदेखील अभिनेत्रीने परिधान केला आहे.

“आळस मला आलेला आहे”, असं कॅप्शन विद्याने या व्हिडीओला दिलं आहे. या रीलवर भाडिपाने प्रतिक्रिया देत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. विद्या बालनची ही रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय, तर चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप गोड”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लय भारी हा”; अभिनेत्री अमृता सुभाषनेदखील कमेंट करत “किती भारी आहे हे” असं म्हटलंय.

हेही वाचा… दिव्यांग चाहत्याला ढकललं अन्…, नागार्जुन यांनी ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मागितली माफी, म्हणाले, “मी त्या गृहस्थाची…”

दरम्यान, विद्या बालनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात विद्या शेवटची झळकली होती. या चित्रपटात विद्याबरोबर ‘स्कॅम’ फेम प्रतीक गांधी, तर अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आणि अभिनेता सेंधिल राममूर्ती हे कलाकारदेखील आहेत. तर विद्या बालन ‘भुल भुलैय्या-३’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan shared funny reel on marathi song amruta subhash reacted dvr