Vidya Balan News : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ‘भूल भुलैया’ चित्रपटात विद्याने साकारलेल्या मंजुलिकाची साऱ्यांनाच भुरळ पडली होती. त्यानंतर आता तिसऱ्या भागात ती पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत झळकली आहे. मध्यंतरीच्या काळात विद्या बालनचे वजन तुलनेने वाढले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचासुद्धा सामना करावा लागला होता. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया ३ मध्ये विद्याचा एकदम आधीसारखा बारीक लूक पाहायला मिळत आहे. विद्याने याबद्दल नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. त्यात तिने बारीक होतानाचा अनुभव शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी अधी असा विचारही केला नव्हता अशा भूमिका मला बारीक झाल्यानंतर मिळत आहेत. ‘द डर्टी’ चित्रपटानंतर मी पुन्हा एकदा माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. या चित्रपटाच्या काळात माझे शरीर फार जास्त स्थूल झाले होते. शरीर जाड होत असल्याने त्यावेळी मला अनेकांनी ट्रोल केले. मात्र, या काळात एक वेळ अशी आली की, माझे शरीर कोणत्याही गोष्टींना प्रतिक्रिया देत नव्हते”, असे विद्या म्हणाली.

हेही वाचा : “५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी

u

u

व्यायाम करताच शरीरावर येत होती सूज

विद्याने पुढे तिच्या वर्कआउटबद्दलसुद्धा सांगितले आहे. ती म्हणाली, “मला हार्मोनल समस्या निर्माण झाल्या होत्या. या समस्या सतत वाढत होत्या. त्यावर उपचार सुरू असतानादेखील माझे वजन कमी होत नव्हते. व्यायाम केल्यास वजन कमी होण्याऐवजी ते जास्त वाढत होते. त्यामुळे मी मनातून खचत होते. किती काही केले तरी शरीरावरील सूज कमी होत नव्हती”, असे विद्या म्हणाली.

मुलाखतीत पुढे तिने सांगितले, “माझे शरीर जसे आहे तसे मी सुरुवातीला स्वीकारले. कारण- मला हे समजले होते की, वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम, जेवण आणि पाणी पुरेसे नाही. त्यासाठी तुमच्या मनानेदेखील तुम्हाला साथ दिली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या शरीराचा स्वीकार केला. त्यावर प्रेम केले. मनातून शरीरावर होणारे सर्व बदल मी आनंदाने स्वीकारले. त्यानंतर मी डॉक्टरांचादेखील सल्ला घेतला.”

“माझ्या शरीरावर माझे प्रेम आहे. आता ते मला जसे हवे, तसे नाही. त्यामुळे मी त्याचा द्वेष करू शकत नाही, हे मी स्वत: माझ्या मनाला समजावले. सर्व गोष्टी स्वीकारण्याआधी मी फार स्ट्रेसमध्ये असायचे. हा सर्व स्ट्रेस शरीरावर दिसत होता आणि त्यामुळेच माझे वजन कमी होत नव्हते”, असेही विद्या बालन म्हणाली आहे.

मुलाखतीत विद्याने झोया अख्तरने केलेल्या प्रशंसेचा उल्लेख केला आहे. “झोया मला म्हणाली होती की, मी या रूपात सर्वाधिक सुंदर दिसते. मी हेच वाक्य मनात साठवून ठेवले आणि स्वत:वर प्रेम केले. काही वर्षे आधी माझे वजन जास्त असल्याने अनेक कामे करता आली नाहीत. आता वजन कमी झाल्यानंतर मी विचारही केला नव्हता अशी कामे मला मिळत आहेत”, असेही विद्याने यावेळी सांगितले.

हेही वाचा : Bigg Boss 18: टास्कदरम्यान अविनाश मिश्राचा संयम सुटला, जोरात धक्का मारून दिग्विजय राठीला किचनमध्ये पाडलं, व्हिडीओ होतोय व्हायरल

u

‘भूल भुलैया ३’मध्ये विद्याला पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत पाहून चाहचे खूश झालेत. त्यात विद्याने धकधक गर्ल माधुरी दीक्षितबरोबर नृत्य सादर केले आहे. या गाण्यात माधुरीसमोर विद्या फिकी पडेल की काय, अशी शंका काही नेटकऱ्यांना होती. मात्र, विद्याने माधुरीच्या तोडीस तोड नृत्य सादर केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan shared her experience during weight loss she said i getting rols that i never thought possible rsj