बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) दिवाळीत ‘भूल भुलैय्या ३’ या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून विद्या पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. २००७ साली आलेल्या ‘भूल भुलैय्या’ या सिनेमात विद्या अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. २०१२ मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमाने विद्याला मोठं यश मिळवलं आणि ती अधिक लोकप्रिय झाली. त्यानंतर आलेल्या ‘कहानी’ सिनेमातील सशक्त अभिनयाने विद्या पुन्हा चर्चेत आली. याच सिनेमाच्या यशानंतर, २०१२ मध्ये विद्याने प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी लग्न केले. मात्र लग्नाच्या १२ वर्षांनंतरही विद्या आज भाड्याच्या घरातच राहते.

विद्या बालन अनेकदा आपल्या घरात रील बनवून सोशल मीडियावर शेअर करते. मात्र, त्या रील्समध्ये दिसणारं घर हे तिचं स्वतःचं नसून भाड्याचं आहे. विद्या बालनने अजूनपर्यंत स्वतःचं घर खरेदी केलेलं नाही, पण आता ती घर घेण्याबाबत विचार करत आहे. सिडनीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना विद्याने सांगितलं की घर खरेदी करणं हे खूपदा नशिबावर अवलंबून असतं.

हेही वाचा…जिच्यासाठी मुलगा पाहायले गेला, तिच्याशीच नंतर केलं लग्न; बॉलीवूड अभिनेत्याची फिल्मी लव्ह स्टोरी, पत्नीला ठेवलेलं मुलांच्या वसतिगृहात

लग्नानंतर घराचा शोध

विद्या बालन म्हणाली की जेव्हा तिने सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केलं, त्यावेळी ती घर शोधत होती. जवळपास २५ घरं पाहूनही, तिला आणि सिद्धार्थला त्यांना दोघांना पसंत पडेल असं घर मिळालं नाही. नंतर त्यांना एक घर मिळालं, जे दोघांनाही आवडलं, पण ते भाड्याचं होतं.

घर खरेदी करण्याचा विचार डोक्यात ठेवून विद्या आणि सिद्धार्थने बराच काळ घर शोधलं, पण त्यांना काहीच आवडलं नाही. अखेर त्यांनी भाड्याचं घर घेण्याचा निर्णय घेतला. “गर्दीच्या शहरात जवळ बाग असणारं आणि समुद्र खिडकीतून दिसावा असं घर मिळणं कठीण आहे, त्यामुळे आम्ही भाड्याचं घर घेतलं आणि हो आमच्या घरमालकाला चांगले पैसे मिळत आहेत,” असं तिने हसत हसत सांगितलं.

हेही वाचा…‘आदिपुरुष’मध्ये रावण साकारल्यावर झाली टीका; सैफ अली खान पहिल्यांदाच झाला व्यक्त, म्हणाला…

विद्या बालनची संपत्ती

फिल्मी बीटच्या अहवालानुसार, विद्या बालन कोट्याधीश आहे. तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर हा चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक आहे. तो वॉल्ट डिस्ने कंपनी इंडियाचा माजी व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. कोइमोईच्या अहवालानुसार, या जोडप्याची एकूण संपत्ती सुमारे १७३ कोटींच्या आसपास आहे.