अभिनेत्री विद्या बालनचा अलीकडे कोणताही चित्रपट आलेला नाही. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत असते आणि त्यावरचे रील्स देखील बनवत असते. मोठ्या पडद्यावर पाहता येत नसलं तरी तिच्या चाहत्यांना तिचे रील्स बघायला मिळतात. विद्या तिचे फोटो आणि इतर व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या विद्याचा असाच एक ट्रेंडी व्हिडीओ व्हायरल होत आहे.
‘इन्स्टंट बॉलिवूड’ने अभिनेत्री विद्या बालनचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका ट्रेंडी डायलॉगवर लिपसिंक करत गुगलला एक गाणं वाजवण्याची सूचना देते, पण तिची सूचनेनंतर गुगल असिस्टंट भन्नाट रिप्लाय देते आणि विद्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे असतात. व्हिडीओमध्ये विद्या काळी टी-शर्ट आणि केसांची वेणी घालून हातात फोन पकडून दिसत आहे. “हॅलो गूगल, अभी जिंदा हू तो जी लेने दो, जी लेने दो, भरी बरसात मे पी लेने दो, मुझे तुकडो मे नहीं जीना है, कटा कतरा को नही पिना है, ये वाला गाना सुनाओ”, असं ती म्हणते. त्यावर गुगल भन्नाट रिप्लाय देतं. “दू ही लाईन बची है तू ही गा ले” म्हणजेच “फक्त दोन ओळी उरल्यात त्या पण तूच गाऊन घे”, असं ती गूगल असिस्टंट म्हणते. त्यावर विद्याचे हावभाव कसे होते, हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहाच.
दरम्यान, विद्या बालन तिच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींच्या चित्रपटांबद्दल होणाऱ्या भेदभावावर भाष्य केलं होतं. तसेच आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट हिट झाल्यानंतर त्याचं सर्व श्रेय दिग्दर्शक संजय लीला भन्सालींनी घेतलं, हे हास्यास्पद असल्याचं ती म्हणाली होती. विद्या ‘शेरनी’ व ‘जलसा’ या चित्रपटात दिसली होती. सध्या ती अनू मेनन दिग्दर्शित ‘नियत’ या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.