बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल ‘IB71’ नावाचा दमदार चित्रपट घेऊन येत आहे. हे १९७१ मधील एका मोठ्या गुप्त मिशनच्या सत्य घटनेवर हा चित्रपट बेतलेला आहे. या मिशनसाठी ३० एजंटनी १० दिवसांत विजयासाठी तयारी केली. पाकिस्तानविरुद्ध देशाला विजय मिळवून देणारी कथा तब्बल ५० वर्षे लोकांपासून दडवून ठेवली होती. आता हीच कथा मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘IB71’ च्या ट्रेलरची सुरुवात एका विमानाने होते, ज्याचा IB एजंट विद्युत जामवाल पायलट आहे, हे विमान क्रॅश होणार आहे. आत बसलेले सगळे घाबरलेले दिसतात. कोणीतरी त्यांना लँडिंग रद्द करण्याचा सल्ला देताना आपल्याला दिसत आहे.

आणखी वाचा : Video : नेहा शर्माचा पिवळ्या लेहेंग्यातील बोल्ड लूक व्हायरल; नेटकरी म्हणाले, “ही दुसरी उर्फी जावेद…”

१८६५ च्या युद्धानंतर १९७१ मध्ये पाकिस्तानने भारतावर वचपा काढण्यासाठी मोठी तयारी केली होती. हा हल्ला थांबवण्याची ही साहस कथा या चित्रपटातून उलगडणार आहे.

या चित्रपटाद्वारे, १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपल्याला विजय मिळवून देणार्‍या या अविश्वसनीय सत्य कथेचे साक्षीदार आता आपल्याला व्हायची संधी या चित्रपटातून मिळणार आहे. हे मिशन ५० वर्षे लपवून ठेवण्यात आले होते. या अॅक्शन चित्रपटाद्वारे विद्युत जामवाल निर्माता म्हणूनही पदार्पण करणार आहे. विद्युतसह या चित्रपटात अनुपम खेर आणि इतर काही कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहे हा चित्रपट १२ मे २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidyuat jamwal and anupam kher starrer secret mission thriller ib 71 movie trailer out avn