बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवालचा ‘क्रॅक’ चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. चित्रपट फ्लॉप झाल्यावर विद्युतचं मोठं नुकसान झालं आहे. चित्रपटामुळे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत, अशी माहिती त्यानेच दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्युतचा ‘क्रॅक’ चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ४५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण रिलीजनंतर चित्रपटाने फक्त १७ कोटी रुपयांची कमाई केली. विद्युत जामवालला जवळपास ३० कोटी रुपयांचं नुकसान झालं, त्याने तीन महिन्यांत ते सर्व पैसे वसूल केले आहेत, असं सांगितलं.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

विद्युत जामवालने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की चित्रपट फ्लॉप झाल्यावर तो फ्रेंच सर्कस टीममध्ये सामील झाला. विद्युत जामवाल म्हणाला, “‘क्रॅक’च्या अपयशामुळे मला खूप तोटा झाला. या अपयशाला सामोरं कसं जावं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. पैसे गमावण्यावर अनेक सल्ले मिळतात. ज्या लोकांनी आयुष्यात पैसे गमावले होते आणि ज्यांना खरोखर माझी काळजी आहे अशा मित्रांनी सल्ले दिले. पण माझ्यासाठी त्या सर्व सल्ल्यांपासून दूर जाणे महत्त्वाचे होते. ‘क्रॅक’ रिलीज झाल्यानंतर मी फ्रेंच सर्कसमध्ये सहभागी झालो आणि त्यांच्याबरोबर १४ दिवस घालवले.”

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

विद्युत पुढे म्हणाला, “मी कंटॉर्शनिस्टबरोबर वेळ घालवला. कंटोर्शनिस्ट ही अशी व्यक्ती असते जी आपले शरीर कोणत्याही दिशेने किंवा कोणत्याही स्थितीत कसेही व कितीही वळवू शकते, जे जवळजवळ अशक्य असतं. मी त्यांच्याबरोबर वेळ घालवला आणि विचार करत होतो की हे कसं शक्य आहे. त्यानंतर मी मुंबईला परतलो तोपर्यंत सर्व काही शांत झालं होतं. मी परत आलो, बसलो आणि विचार केला, ठीक आहे.. माझे इतक्या कोटींचे नुकसान झाले आहे. तर आता मी काय करू? आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण तीन महिन्यांत मी कर्जमुक्त झालो. हा एक चमत्कार होता.”

फक्त दोन कोटींचे बजेट अन् चित्रपटाने ४२ वर्षांपूर्वी कमावले होते १०० कोटी, तुम्ही पाहिलाय का हा बॉलीवूड सिनेमा?

विद्युतला त्याच्या मित्रांनी विचारलं की त्याने हे कर्ज कसं फेडलं तेव्हा तो म्हणाला की त्याने या गोष्टीचा ताण घेतला नाही आणि एक योजना यशस्वीरित्या अमलात आणली. त्याबद्दल त्याने जास्त माहिती दिली नाही. दरम्यान, आदित्य दत्त दिग्दर्शित ‘क्रॅक’मध्ये अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि एमी जॅक्सन देखील होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidyut jammwal joined a french circus to recover losses of crakk box office failure hrc