Vijay Raaz Controversy over Son of Sardaar 2 : ‘सन ऑफ सरदार २’मधून अभिनेते विजय राज यांना काढण्यात आलं आहे. याप्रकरणी निर्माते व विजय राज वेगवेगळी कारणं सांगत आहेत. अजय देवगणला (Ajay Devgn) अभिवादन न केल्याने चित्रपटातून काढून टाकण्यात आलं, असा दावा विजय राज यांनी केला आहे, तर वाईट वर्तन आणि महागड्या खोलीची मागणी केल्याने त्यांना चित्रपटातून काढल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत निर्माते कुमार मंगत म्हणाले, “होय, हे खरंय आहे आम्ही विजय राज यांना त्यांच्या सेटवरील वागणुकीमुळे चित्रपटातून काढून टाकलं आहे. त्यांनी मोठ्या खोल्या व व्हॅनिटी व्हॅनची मागणी केली. त्यांनी स्पॉट बॉईजसाठी आमच्याकडून जास्त पैसे मागितले. त्यांच्या स्पॉट बॉयला एका दिवसाचे २० हजार दिले जात होते, जे खूप जास्त आहेत. यूके महागडे ठिकाण आहे आणि शूटिंगदरम्यान प्रत्येकाला स्टँडर्ड खोल्या देण्यात आल्या होत्या, पण त्यांनी प्रीमियम सूटची मागणी केली. आम्ही त्यांना खर्चाची परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला. तसेच ते उद्धटपणे म्हणाले, ‘तूच माझ्याकडे आलास, मी तुझ्याकडे काम मागायला आलो नाही’. त्याचं असं वागणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. त्यांनी तीन कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी दोन कारची मागणी केली होती,” असा दावाही मंगत यांनी केला.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

Kalki 2898 AD: प्रभासचा चित्रपट ‘या’ दोन OTT प्लॅटफॉर्म्सवर होणार प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा

विजय राज काय म्हणाले?

याप्रकरणी विजय राज यांनी वेगळंच कारण सांगितलं आहे. पहिल्या दिवशी सेटवर अजय देवगणला अभिवादन न केल्यामुळे चित्रपटातून काढून टाकल्याचा दावा त्यांनी केला. “मी वेळेआधीच सेटवर पोहोचलो होतो. तिथे रवी किशन, कार्यकारी निर्माता आशिष, निर्माते कुमार मंगत आणि चित्रपट निर्माते विजय अरोरा मला भेटायला आले होते. मी व्हॅनमधून बाहेर पडलो आणि अजय देवगणला पाहिलं, जो माझ्यापासून २५ मीटर दूर उभा होता. तो व्यग्र असल्याने मी त्याला अभिवादन केले नाही. २५ मिनिटांनंतर मंगत माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘तुम्ही चित्रपट सोडू शकता, आम्ही तुम्हाला काढून टाकतोय'” असं त्यांनी सांगितलं. मोठ्या खोलीच्या मागणीबद्दल विजयला विचारलं असता सकाळी योगासन करण्यासाठी थोडी जागा हवी होती असं ते म्हणाले. “मी २६ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे, मी ही मागणी करू शकत नाही का?” असा प्रश्न त्यांनी केला.

Munjya on TV: सुपरहिट ‘मुंज्या’ OTT नव्हे तर टीव्हीवर होतोय प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

ते पुढे म्हणाले, “माझ्याकडून एकच चूक झाली ती म्हणजे मी अजय देवगणला अभिवादन केले नाही. सेटवर पोहोचल्यानंतर ३० मिनिटांनी मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले, कारण मी अजय देवगणला अभिवादन केले नाही. हे शक्तिशाली लोक आहेत, मी चुकीचं वागण्याचा प्रश्नच येत नाही.”

निर्मात्यांनी फेटाळला दावा

कुमार मंगत यांनी अजय देवगणला अभिवादन न केल्यामुळे काढून टाकल्याचा विजय राज यांचा दावा फेटाळला. “विजय राज यांना काढून टाकल्यामुळे आम्हाला किमान दोन कोटींचे नुकसान झाले आहे. अशा लहान गोष्टींसाठी आम्ही एवढं मोठं पाऊल उचलणार नाही. त्यांचं वागणंच चिंतेची बाब होती,” असं कुमार मंगत म्हणाले.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

विजय राज यांच्या टीममधील एका व्यक्तीवर हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला होता, असा दावा कुमार मंगत यांनी केला. “टीममध्ये अशा राक्षसी व्यक्तीबरोबर काम करण्याची कल्पना करा. आम्हाला याबद्दल हॉटेलकडून अधिकृत ई-मेल आला. सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. विजय राज चित्रपटाचा भाग नसल्याचा आम्हाला आनंद आहे, कारण आम्हाला अशा व्यक्तीबरोबर काम नाही करायचं,” असं मंगत म्हणाले.

दुसरीकडे निर्माते दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून सांगत असल्याचा दावा विजय राज यांनी केला. “दोन गोष्टीत किमान १० तासांचे अंतर आहे. मला ४ ऑगस्टला दुपारी दोन वाजता चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि हॉटेलमधील प्रकार त्या रात्री ११ वाजता घडला. या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. मी आता त्या स्पॉट बॉयबरोबर काम करत नाही,” असं विजय राज म्हणाले.

औरंगाबादमध्ये जन्म, दमदार पदार्पण अन् सुपरहिट सिनेमे करून बॉलीवूड सोडलं; आता गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय अभिनेत्री

‘सन ऑफ सरदार २’ हा अजय देवगण, संजय दत्त व सोनाक्षी सिन्हा यांच्या २०१२ मधील चित्रपटाचा सीक्वेल आहे. अश्विनी धीर दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये अजय देवगणबरोबर मृणाल ठाकूर दिसणार आहे. रवी किशन संजय दत्तची जागा घेणार आहे. तर विजय राजच्या जागी संजय मिश्रा झळकतील.

Story img Loader