श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दिवसेंदिवस लांबणीवर जात आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती व बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ अभिनीत असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सतत बदलली जात आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘मेरी ख्रिसमस’ ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर तारीख बदलून १५ डिसेंबर चित्रपट प्रदर्शनाचा मुहूर्त ठरवण्यात आला. पण आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

विजय सेतुपती व कतरिना कैफचा ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीची खूप चर्चेत आहे. याचं सर्वात मोठं कारण आहे, प्रदर्शनाची तारीख. ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता विजय सेतपुती व कतरिना कैफच्या चाहत्यांना या बहुचर्चित चित्रपटाची आणखी वाट पाहावी लागणार आहे. आता हा चित्रपट थेट २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Shocking video lion and leopard clashed on a tree thrilling fight video went viral
VIDEO: बापरे! सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात…तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट

हेही वाचा – Video: अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात देणार गुडन्यूज? प्रेग्नेंसी टेस्टची चर्चा, म्हणाली…

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाबाबत एक ट्वीट केलं आहे; ज्यामधून त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. विजय व कतरिनाचा हा चित्रपट आता १५ डिसेंबर नाही तर १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाची हृतिक रोशन व दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’शी टक्कर होताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: लिपस्टिकच्या ‘त्या’ वादावर आलिया भट्टने सोडलं मौन; रणबीर कपूरला ‘टॉक्सिक’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीनं दिलं सडेतोड उत्तर

हेही वाचा – “माझ्याकडून शंभर पैकी….”, दिग्दर्शक विजू मानेंची ‘नाळ २’ चित्रपटाविषयी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान, मीडिया रीपोर्टनुसार हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर असून याचं कथानक ख्रिसमसच्या पूर्वसंध्येभोवती फिरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘अंधाधून’, ‘बदलापूर’सारखे लाजवाब आणि हटके चित्रपट देणाऱ्या श्रीराम राघवन यांच्या या चित्रपटाची भारतीय प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे.

Story img Loader