शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. पण त्यापूर्वी शाहरुख खानने चेन्नईच्या श्री साईराम इंजिनिअरींग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या प्री-रिलीझ इव्हेंटला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान जवानचा दिग्दर्शक अॅटली आणि ‘जवान’मध्ये नकारात्मक भूमिका करणारा विजय सेतुपती यांनी किंग खानचे कौतुक केले. तसेच त्याच्याशी संबंधित मनोरंजक वैयक्तिक किस्से शेअर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“मुलाला हात लावण्याआधी…”, ‘जवान’मधील शाहरुख खानचा ‘तो’ डायलॉग ऐकून नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे; म्हणाले…

विजय सेतुपतीने त्याच्या शालेय दिवसातील एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “मी शाळेत असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. पण तिला कळलं नव्हतं. प्रत्येक जानूमध्ये एक राम असतो (त्याच्या ९६ चित्रपटातील पात्रांची नावं). पण ती मुलगी शाहरुखच्या प्रेमात होती. तो बदला घेण्यासाठी मला इतकी वर्षे लागली.”

Video: “हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम धर्म स्वीकारला”? प्रश्न ऐकताच राखी सावंत गोंधळली; क्षणभर विचार केला अन्…

शाहरुखने विजयला यावर उत्तर दिलं. “इथं सर्वजण तामिळमध्ये बोलत आहेत आणि मला खात्री आहे की ते सर्व माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलले असतील. विजय सेतुपती ज्या मुलीबद्दल बोलत होते ते सोडून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर तुम्ही तुमचा बदला घेऊ शकता पण मुली नाही. त्या माझ्या आहेत,” विजयला उत्तर देताना शाहरुखने अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

“फातिमा नाही तर झॉम्बी”, उमराहवरून परतलेल्या राखीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “मुंबईत आल्यावर तिचा बुरखा…”

कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शक अॅटलीने शाहरूखबद्दलचा एक किस्सा शेअर केला. अॅटली म्हणाला, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. जेव्हा मी दिग्दर्शक शंकरसोबत मुंबईत एन्थिरनसाठी काम करत होतो. मला माझ्या मित्राने सांगितलं की आम्ही शाहरुखच्या घराबाहेर शूटिंग करत आहोत. त्याने मला मन्नतच्या गेटसमोर फोटो काढायला सांगितलं होतं. त्यानंतर १३ वर्षांनंतर तोच गेट उघडला किंग खानने स्वतः ‘वेलकम, अॅटली सर’ म्हटलं.” दरम्यान, शाहरुख खानव्यतिरिक्त जवानमध्ये नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्या भूमिका आहेत.