दाक्षिणात्य अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. आता त्यातील अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत प्रेक्षकांवर आपली छाप पडली आहे. अभिनेता विजय सेतुपती हा त्यातलाच एक. तो लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. ‘जवान’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात तो शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. आता शाहरुख खानबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव कसा होता हे त्याने शेअर केलं आहे.
शाहरुखचे चाहते त्याच्या ‘जवान’ या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर दक्षिणात्य अभिनेत्री नयनताराही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे विजय सेतुपतीदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. शाहरुखबरोबर काम कारण त्याने खूप एन्जॉय केलं. तसंच शूटिंग दरम्यान त्याला शाहरुखची माफी ही मागवी लागल्याचं त्याने नुकतंच सांगितलं.
आणखी वाचा : आलिया भट्ट पुन्हा गरोदर? फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, “२.०…”
विजय म्हणाला, “शाहरुख खान हा खूप प्रेमळ आणि नम्र आहे. तो इतका मोठा सुपरस्टार आहे हे त्याच्या वागण्या-बोलण्यात तो कधीही दर्शवत नाही. तो सहकलाकारांना खूप पटकन कम्फर्टेबल करतो. तो इतक्या आत्मीयतेने प्रत्येकाशी संवाद साधतो की त्याच्याबरोबर सीन्सबद्दल चर्चा करताना मला कधीही कुठलाही संकोच वाटला नाही. याउलट अनेकदा मला त्याची माफी मागावी लागली. मी त्याच्याशी बोलल्यावर त्याला अनेकदा म्हणायचो की, “मला माफ कर मी तुला त्रास दिला.” त्यावर तो म्हणायचा, “काही हरकत नाही, तू बोल माझ्याशी.”
हेही वाचा : शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण
दरम्यान शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘जवान’ हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपती यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून अभिनेत्री दीपिका पदुकोण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे असं बोललं जात आहे.