अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा ही बी-टाऊनमधील नवी जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही झाले होते. काही दिवसांपूर्वीच तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले. तमन्नाने विजयला डेट करत असल्याचा खुलासाही केला होता. मात्र, आता ही नवी जोडी एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामगाचं कारण म्हणजे विजय वर्माने तमन्नाला दिलेलं टोपण नाव.

हेही वाचा- खासगी रेल्वे, एका गाण्यासाठी १ कोटी मानधन अन्…; भारतातील पहिली महिला कोट्यधीश गायिका कोण होती?

Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”
Abhishek Bachchan
“आराध्याकडून कोणत्या अपेक्षा…”, अभिषेक बच्चन पालकत्वावर बोलताना म्हणाला, “फक्त आई-वडिलांनी…”

या वर्षी बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेता विजय वर्मा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या दहाड या वेब सिरीजचा वर्ल्ड प्रीमियर प्रदर्शित झाला. विजय वर्मा त्याची सहकलाकार सोनाक्षी सिन्हा आणि दिग्दर्शक रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय आणि निर्माती झोया अख्तर यांच्यासह प्रीमियरला उपस्थित होता. या निमित्त तमन्ना भाटियाने विजय वर्माला शुभेच्छा दिल्या होत्या. तमन्नाने इन्स्टाग्रामवर टीम ‘दहाड’चा फोटो टाकत शुभेच्छा दिल्या होत्या. विजय वर्माने तमन्नाची ही स्टोरी शेअर करत ‘थॅक्यू टमाटर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “मी तुमच्यावर…”; धर्मेंद्र यांच्या भावनिक पोस्टला ईशा देओलचे उत्तर, म्हणाली…

विजयच्या या प्रतिक्रियेनंतर त्याने तमन्नाला दिलेल्या टोपणनावाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ‘लस्ट स्टोरी २’ च्या चित्रीकरणादरम्यान तमन्ना आणि विजय एकमेकांच्या जवळ आले होते. एका मुलाखतीत तमन्नाने विजयबरोबच्या नात्यावर भाष्य केले होते. विजयप्रमाणे तमन्नानेही त्याला टोपण नाव दिले आहे. तमन्ना त्याला हॅप्पी प्लेस नावाने हाक मारते.

हेही वाचा-…जेव्हा धर्मेंद्र यांनी दारुच्या नशेत धरली होती आपल्याच वडिलांची कॉलर; शिव्या देत म्हणाले होते…

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरी’ या चित्रपटाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘लस्ट स्टोरी २’ आज (२९ जूनला) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, विजय वर्मा, नीना गुप्ता, काजोल, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, कुमुद मिश्री, अमृता सुभाष यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.

Story img Loader