अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा ही बॉलीवूडची नवी जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या नात्याची बॉलीवूडमध्ये चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. अलीकडेच दोघेही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेले होते. मालदीव येथून परतल्यावर दोघेही विमानतळावर वेगवेगळे बाहेर पडले. यावेळी पापाराझींनी विचारलेल्या प्रश्नामुळे विजय वर्मा काहीसा संतापला. नेमकं घडलं जाणून घेऊयात…
हेही वाचा : “हे लोणावळ्यात नेहमीच घडतं”, दुप्पट टोलमुळे मराठी कलाकार त्रस्त! आणखी एका अभिनेत्याने व्यक्त केला संताप
तमन्नाचे मालदीवच्या ट्रिपचे फोटो पाहता दोघेही एकत्र मालदीवमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ३१ ऑगस्टला मुंबई विमानतळावर एकत्र होते परंतु, बाहेर येताना दोघंही वेगवेगळे बाहेर आले. विजय वर्मा चाहत्यांबरोबर सेल्फी काढत असताना पापाराझींनी त्याला “कशी झाली तुमची ट्रिप ? मालदीवच्या समुद्रात मजा करून आलात ना?” असा प्रश्न विचारला.
पापाराझींचा प्रश्न ऐकून विजय वर्मा काहीसा संतापला आणि “तुम्ही असं बोलू शकत नाही” असं उत्तर देत निघून गेला. पापाराझींनी केलेली कमेंट विजयला अजिबात आवडली नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे तो नाराज झाला. हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनीही पापाराझींना ट्रोल केलं आहे.
हेही वाचा : Video: ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात तिच्या नखरेल अदा पाहून प्रेक्षक म्हणतात…
दरम्यान, २०२३ चे स्वागत करताना विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ‘लस्ट स्टोरी २’ च्या प्रमोशन दरम्यान, विजय आणि तमन्ना एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट झालं होतं. बॉलीवूडच्या या नव्या जोडीला चाहत्यांनीही पसंती दिली आहे.