अभिनेता विजय वर्मा हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनय क्षेत्रातील कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्याने मनोरंजनसृष्टीत त्याच्या टॅलेंटच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘पिंक’, ‘मिर्झापुर’, ‘गली बॉय’, ‘मंटो’, ‘बागी’ असे विविध चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने केलेल्या कामाचे प्रेक्षक नेहमीच कौतुक करतात. परंतु त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाला आहे. त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करावे अशी त्याच्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती. तो त्याच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध घरातून पळून अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आला. मुख्य म्हणजे त्याला पळून जाताना त्याच्या आईने मदत केली, असा खुलासा त्याने नुकताच एका मुलाखतीत केला आहे.

हेही वाचा : “माझ्या गरोदरपणानंतर…,” ‘तारक मेहता…’मध्ये ‘रिटा रिपोर्टर’ साकारणाऱ्या प्रिया अहुजाचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली…

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, “मी दहावी-अकरावीत असताना मला सांगायचे की, मी खूप छान दिसतो. मी अभिनय किंवा मॉडेलिंग क्षेत्रात करिअर केलं पाहिजे. पण मी तेव्हा त्यांचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाही. मी बीकॉम केलं आणि जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. अभिनय क्षेत्रात काम करणं ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं मला वाटत होतं. पण इतर जॉब्स केल्यानंतर जेव्हा मी थिएटर करू लागलो तेव्हा मला जाणवलं की अभिनय करणं मी सगळ्यात जास्त एन्जॉय करत आहे.”

आणखी वाचा : तमन्ना भाटियाला डेट करण्याबद्दल विजय वर्माने सोडलं मौन, ट्वीट करत म्हणाला…

पुढे तो म्हणाला, “मी पुण्याच्या ‘एफटीआयआय’मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. त्याआधी मी हैदराबादमध्ये वडिलांपासून लपून नाटकांमध्ये काम करू लागलो. कारण मी अभिनय करावा असं त्यांना कधीही वाटत नव्हतं. मी त्यांच्या नकळत नाटकांमध्ये काम करतोय हे त्यांना एकदा कळलं तेव्हा त्यांना वाटलं की, हा माझा छंद आहे आणि मी चार-पाच दिवसांमध्ये हे थांबवेन. पण मी अभिनय शिकण्यासाठी फॉर्म भरला होता आणि माझी निवडही झाली होती. मला एका वर्षाचा कोर्स करण्यासाठी जायचं होतं. या गोष्टीला माझे वडील तयार होणार नाहीत, हे मला ठाऊक होतं. त्यामुळे मी आईबरोबर चर्चा करून पळून जाण्याचा प्लॅन केला आणि घरातून पळून गेलो.” विजयचं हे बोलणं ऐकून आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay varma mother helped him to escape from their home to persue acting career rnv
Show comments