सारा अली खान, करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी आणि विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘मर्डर मुबारक’ सिनेमा १५ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मर्डर मिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच सारा आणि विजय वर्मा एकत्र काम करताना दिसत आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात दोघांनी एक इंटिमेट किसिंग सीन दिला आहे, हा सीन शूट करतानाचा अनुभव विजय वर्माने सांगितला आहे.
विजय वर्मा आणि सारा अली खान यांनी ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात प्रेमी युगुलाची भूमिका साकारली आहे. त्यात एकतर्फी प्रेमाची कथाही दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात त्यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांनी एकत्र एक इंटिमेट सीनही दिला आहे, ज्याची खूप चर्चा आहे. विजयने साराबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. दोघांची जशी केमिस्ट्री पडद्यावर दिसतेय त्यापेक्षा सेटवर ते खूप वेगळे वागायचे, ते एकत्र खूप हसायचे आणि मस्करी करायचे. सारासोबत इंटिमेट सीन करेल आणि तेही एवढ्या जबरदस्त केमिस्ट्रीसह करेल, याची कधीच कल्पना केली नव्हती, असं विजय म्हणाला.
Video: मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दणक्यात साजरा झाला आलिया भट्टचा वाढदिवस, अंबानी कुटुंबाने लावली हजेरी
सारासोबतच्या रोमँटिक सीनबद्दल विजय म्हणाला…
इंटिमेट सीनबद्दल विजय वर्मा म्हणाला, “सारा तिच्या कॅरेक्टरमध्ये इतकी शिरली होती तिने मला जवळ ओढलं आणि उत्तम सीन दिला.” जेव्हा दोन कलाकार एकमेकांबरोबर कंफर्टेबल असतात आणि कोणताही संकोच नसतो तेव्हा ते त्यांच्या भूमिका उत्तमरित्या साकारू शकतात आणि केमिस्ट्री देखील तयार करू शकतात, असं या सीनबाबत विजय वर्माने म्हटलं.
करीनाबरोबर केला होता रोमँटिक सीन
साराआधी विजयने करीना कपूरबरोबर ‘जाने जान’ या चित्रपटात काम केलं होतं. या सिनमात करीनासोबत त्याचे काही रोमँटिक सीन्स होते. ते सीन शूट करताना घाबरलो होतो, असं विजयने सांगितलं होतं.