नव-वर्षाच्या आदल्या दिवशी एकत्र पार्टी करताना दिसल्यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या नात्याबद्दल खूप चर्चा सुरू आहेत. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जातंय. अशातच मंगळवारी दोघांचे एकाच ठिकाणचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते लंच डेटवर गेले होते, अशा चर्चा सुरू झाल्या. दोघेही मुंबईच्या वांद्रे भागात एकाच ठिकाणी दिसले होते. त्यांचे फोटो अनेक पापाराझी अकाउंट्सनी सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: किसिंग व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकत्र दिसले तमन्ना-विजय; नेटकरी म्हणतात, “बकवास…”

दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या बातम्याही येऊ लागल्या. या चर्चांवर विजय वर्माने प्रतिक्रिया दिली आहे. विजय व तमन्ना एकत्र लंच डेटवर गेल्याचं वृत्त समोर आल्यावर अभिनेत्याने ट्वीटरवरून प्रतिक्रिया दिली. त्याने ट्विटरवर फोटो शेअर करत त्याची खरी “लंच डेट” कोण होती हे उघड केलं. अभिनेत्याने चित्रपट निर्माता सुजॉय घोष यांच्याबरोबरचा मिरर सेल्फी शेअर केला आहे. विजय व तमन्ना लंच डेटवर गेले नव्हते, तर ते सुजॉय घोषला भेटले होते.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजय एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाली होते. त्या इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये तमन्ना तिच्या ट्रॉफीबरोबर पोज देताना दिसली होती, तर विजय त्याच्या ट्रॉफीसह तमन्नाच्या पुढे गेला. नंतर त्याने तिथे थांबत तमन्नाबरोबर फोटोसाठी पोज दिल्या होत्या.

तमन्ना आणि विजय सुजॉय घोष यांच्या नेटफ्लिक्स सेगमेंटमध्ये ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये एकत्र दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay varma response on tamannaah bhatia dating rumors hrc
Show comments