सध्याच्या काळात अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे बी-टाउनमधील सर्वात चर्चेतील जोडपं आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी नात्याची कबुली दिली. त्यानंतर सातत्याने ते त्यांच्या नात्याविषयी बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ३७ वर्षीय विजयने लग्नासाठी घरून येणाऱ्या दबावाबद्दल भाष्य केलं. आपण लग्नाचे वय ओलांडले आहे, असं तो हसत म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेत्रीला मुलाखतीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला, “मी मारवाडी आहे, आमच्या समाजात मुलांचे लग्नाचे वय १६ वर्षे समजले जाते. त्यामुळे माझ्या बाबतीत लग्नाच्या गोष्टी बऱ्याच आधी सुरू झाल्या आणि संपल्यादेखील, कारण मी लग्नाचे वय ओलांडले आहे. इतकंच नाही तर मी अभिनेता झालो, तेही एक कारण होतं,” असंही त्याने हसत सांगितलं.

जिनिलीयाला मिळालेला नाव बदलण्याचा सल्ला, ‘हे’ सुचवलेलं नाव; म्हणाली, “मला प्रत्येकजण…”

त्याची आई लग्नाबाबत त्याच्यावर कसा दबाव आणला आहे, याबद्दलही त्याने सांगितलं. “माझी आई अजूनही प्रत्येक फोन कॉलवर मला लग्नाबाबत विचारते. पण मी ते टाळू शकतोय, कारण मी माझ्या आयुष्यात चांगले काम करत आहे,” असं तो म्हणाला.

विजय वर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी फार उत्तम ठरलं आहे. ‘दहाड’ आणि ‘लस्ट स्टोरीज २’ या सीरिज व चित्रपटाच्या माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडटली आहे. आता लवकरच तो ‘कालकूट’ मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.