‘गली बॉय’चित्रपटातून रणवीर सिंहच्याच बरोबरीने आणखी एका अभिनेत्याचं प्रचंड कौतुक झालं ते म्हणजे विजय वर्माचं. सध्या विजय वर्मा तमन्ना भाटीयाबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असला तरी त्याबरोबरच त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांची जबरदस्त चर्चा असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या करिअरमधील काही महत्त्वाच्या घटनांचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ पैसे मिळणार म्हणून विजयने एका चित्रपटात काम करायला होकार दिला होता, परंतु नंतर त्याच चित्रपटातून त्याची हकालपट्टी करण्यात आल्याचं विजयने स्पष्ट केलं. आपल्या या अनुभवाबद्दल आणि एकूणच चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या अनुभवाबद्दल विजयने मनमोकळेपणे भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “शाहरुखचा ‘डंकी’ हा ‘३ इडियट्स’पेक्षा…” कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांचं मोठं वक्तव्य

‘गलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय वर्मा म्हणाला, “माझ्यासाठी कायम भूमिका ही फार महत्त्वाची असते मी तिलाच प्राधान्य देतो, परंतु आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा माझ्याकडे काहीच पैसे नव्हते, माझ्या बँक अकाऊंटमध्ये फक्त १८ रुपये होते आणि तेव्हा मला एका चित्रपटासाठी कॉल आला. ती एका रिपोर्टरची छोटीशी भूमिका होती. माझं फक्त एका दिवसाचं काम होतं ज्यासाठी मला ३००० रुपये मिळणार होते. मला तशी भूमिका करायची नव्हती तरी मी त्याला होकार दिला.”

पुढे विजय म्हणाला, “मी सेटवर गेलो, शूटिंग सुरू झालं, परंतु माझं मन काही केल्या लागत नव्हतं. मी शूट करताना सतत अडखळत होतो. शिवाय ती भूमिका एका इंग्रजी रीपोर्टरची असल्याने मला त्यात आणखी अडचण येत होती. त्यावेळी मला सेटवरुन हाकलून देण्यात आलं होतं. तोवर मी ‘मॉन्सून शूटआऊट’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. तरीही मला हा असा अनुभव आला होता, त्यावेळी मला फार वाईट वाटलं अन् मी मनाशी खूणगाठ बांधली की यापुढे केवळ पैसे मिळणार म्हणून कोणतीही भूमिका स्वीकारायची नाही.”