बॉलिवूडची नवाब बेगम जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम जुळले, याआधी त्यांनी एकत्र काम केले होते मात्र ‘टशन’ चित्रपटात त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. बरीच वर्ष डेट केल्यानंतर त्या दोघांनी २०१२ साली लग्न केले. आज दोघांना दोन मुलं आहेत. करीना कपूर सध्या तिच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर सैफ आपल्याला मोठ्या मुलाला घेऊन मालदीवला गेला आहे.

बॉलिवूडच्या कलाकारांचे हक्काचे स्थान म्हणजे मालदीव, सध्या हे बाप बेटे तिकडे आपली सुट्टी घालवत आहेत. नुकतेच या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात तैमूर पिझ्झा बनवताना दिसत आहे तर सैफ अली खान त्याला मदत करतो आहे. तैमूने शेफ परिधान करतात तशी टोपी घातली आहे. तर एका फोटोत हे दोघे आराम करताना दिसत आहेत. नुकतीच तैमूरच्या एअरपोर्टवरील एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.

“तिचे उत्तम संगोपन…”; लाडकी लेक अनन्याबद्दल चंकी पांडेने दिली होती प्रतिक्रिया

मध्यंतरी सैफ एका मुलाखतीत आपल्या दोन्ही मुलांबद्दल भरभरून बोलला होता. तो असं म्हणाला होता, ‘जहांगीरच्या जन्मानंतर तैमूर खरंच मोठा झाला आहे. त्या दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग आहे.तैमूर आपल्या धाकट्या भावाच्याबाबतीत अत्यंत संयमशील आणि संरक्षणात्मकदेखील आहे. अशी प्रतिक्रिया सैफने दिली होती.

सैफचा नुकताच ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचा आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करीना राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटात ती आपल्याला दिसणार आहे. कताच तिचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही.

Story img Loader