बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे कायमच चर्चेत असते. नुकताच तिचा’ विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील दोन स्टार हृतिक रोशन, सैफ अली खान यांच्याबरोबर ती झळकली आहे. या चित्रपटात ती सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका दिसली आहे. तिचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत असते. तिने २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलर या ब्रिटीश संगीतकाराशी लग्न केले. लग्नानंतर लगेच तिने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र बेनेडिक्ट टेलरशी लग्न होण्याआधी तिचं नाव तुषार कपूरबरोबर जोडलं गेले होते.

तुषार कपूरबरोबरच्या नात्याबद्दल तिने खुलासा केला आहे. ‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात नुकतीच येऊन गेली आहे. या कार्य्रक्रमात तिने मुंबईबद्दल, करियरबद्दल खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तुषार कपूरबद्दल बोलताना ती असं म्हणाली, ‘मी शोर इन द सिटी हा चित्रपट केला होता त्यातील सायबो हे गाणे हिट झाले होते. या चित्रपटानंतर मी लंडनला नृत्य शिकण्यासाठी गेले होते, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला प्रमोशनसाठी बोलावले होते. त्यांनीच माझे नाव तुषार कपूरशी जोडले’. तेव्हा कार्यक्रमाच्या मुलखातकाराने की मग ‘तुषार कपूरशी तुझे नाव कसे जोडले गेले’? प्रमोशनसाठी ही केलेली युक्ती होती का? म्हणाली तुला असं वाटत का ‘मी तुषारबरोबर अफेअर करेन? मला माहित नाही पण त्या काळात माझे भरपूर मनोरंजन झाले’.

लग्नांच्या चर्चांदरम्यान पार्टीला एकत्र पोहोचले सिद्धार्थ-कियारा; चाहते म्हणाले, “सर्वोत्तम जोडपे….”

राधिकाच्या अभिनयातील प्रवास तितका सोपा नव्हता. मराठी एकांकिका, चित्रपट, नाटक यातून तिला हिंदी चित्रपटात काम मिळत गेले. राधिका मूळची पुण्याची आहे. तिने ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिज तसेच ‘अंधाधुन’, ‘फोबिया’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात ती रितेश देशमुखबरोबर दिसली होती.

नुकतंच तिने एका मुलाखतीत तिच्या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे. बॉलिवूड हंगामा’ दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘करोना महामारीच्या अगोदर म्हणजे २०२० पर्यंत जवळपास ८ वर्षे ती लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होती’. आता राधिका तिचा जास्तीत जास्त वेळ लंडनमध्ये घालवताना दिसते. ‘विक्रम वेधा’च्या प्रमोशनसाठी अलिकडे भारतात परतली होती.

Story img Loader