बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्री कायमच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसून येत आहे. क्रिती सॅनॉन, कियारा अडवाणी, आलिया भट या अभिनेत्री कायमच वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. बॉलिवूडमध्ये मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेदेखील कायमच चर्चेत असते. नुकताच तिचा’ ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील दोन स्टार हृतिक रोशन, सैफ अली खान यांच्याबरोबर ती झळकली होती. या चित्रपटात ती सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसली आहे.

राधिका कायमच आपली मतं ठामपणे मांडत असते. नुकतीच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिने काही खुलासे केले आहेत. ती असं म्हणाली, ‘मला सेक्स कॉमेडी करण्यात कोणतीही अडचण नाही. ‘हंटर’ या चित्रपटाला तुम्ही सेक्स कॉमेडी म्हणू शकता. चित्रपटाचा असा कोणताही एक जॉनर असू शकत नाही. याआधी जे सेक्स कॉमेडीवर आधिरीत चित्रपट आले आहेत त्यात कायमच महिलांची अवहेलना करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने महिलांना दाखवण्यात आले आहे ते मला आवडलेले नाही. म्हणून मी ते चित्रपट केले नाहीत. काही चित्रपट केले नाहीत कारण त्या चित्रपटाची प्रक्रिया खूप लांबवली. या देशात लोक वेळेवर येत नाही’.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
pune Mobile filming was done in washroom of girls school
मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल चित्रीकरणाचा प्रकार, शाळेतील शिपायाविरुद्ध गुन्हा शाळेचा शिपाई अटकेत

तापसी पन्नू व फोटोग्राफर यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद, नेटकरी म्हणाले, “जया बच्चन…”

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत. ती पुढे सेक्स कॉमेडी चित्रपटांबद्दल म्हणाली, ‘चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना समजते हा चित्रपट नक्की कशावर आहे. या चित्रपटाचं म्हणणं काय आहे. काय पद्धतींचे विनोद त्यात लिहले गेले आहेत. त्यातील अभिनेता ज्यापद्धतीने अभिनेत्रींनवर विनोद करतो आणि ते प्रकर्षाने दाखवले जाणार असले तर मी असे चित्रपट करणार नाही’.

राधिकाच्या अभिनयातील प्रवास तितका सोपा नव्हता. मराठी एकांकिका, चित्रपट, नाटक यातून तिला हिंदी चित्रपटात काम मिळत गेले. राधिका मूळची पुण्याची आहे. तिने ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिज तसेच ‘अंधाधुन’, ‘फोबिया’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात ती रितेश देशमुखबरोबर दिसली होती.

राधिका आपटे आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमी मोकळेपणाने बोलत असते, तिने २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलर या ब्रिटीश संगीतकाराशी लग्न केले. लग्नानंतर लगेच तिने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. करोना काळात ती पुन्हा इंग्लंडला परतली. तेव्हापासून राधिका तिच्या नवऱ्यासह तेथे वास्तव्याला आहे.

Story img Loader