’12th फेल’फेम अभिनेता विक्रांत मेस्सी त्याच्या बहुचर्चित चित्रपटानंतर आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अलीकडेच अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. त्यामुळे संपूर्ण भारत सध्या राममय आहे. त्यातच विक्रांत मेस्सीची २०१८ ची एक्सवरची (त्यावेळी ट्वीटर) पोस्ट चर्चेचे कारण बनली आहे. त्यावरून त्याला खूप ट्रोल करण्यात आले. त्यामुळे आता त्याने ती पोस्ट डीलिट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रांत मेस्सीने २०१८ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येबद्दल संताप व्यक्त करताना एक पोस्ट शेअर केली होती. त्यासाठी आता त्याने माफी मागितली आहे. आपल्या माफीनाम्यात विक्रांत मेस्सीने लिहिले की, हिंदू समुदायाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा अनादर करण्याचा त्याचा कधीही हेतू नव्हता.

२०१८ मध्ये विक्रांतने संपादकीय व्यंगचित्र एक्सवर शेअर केले होते; ज्यामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता यांचे संभाषण दाखविले होते. “मला समाधान आहे की, माझे अपहरण तुमच्या भक्तांनी न करता, रावणाने केले होते.” या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सीने त्याचे विचार मांडत लिहिले, “अर्धवट शिजलेले बटाटे आणि अर्धवट विचारसरणीचे देशभक्त कायम त्रासदायक असतात.”

हेही वाचा… सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ चित्रपटाचं पोस्टर अनोख्या पद्धतीने केलं लाँच; पाहा खास Video

मंगळवारी ही वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर विक्रांतने ही पोस्ट सोशल मीडियावरून डीलीट केली. या पोस्टमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याने माफी मागत विक्रांतने लिहिले, “२०१८ मध्ये माझ्या एका ट्वीटच्या संदर्भात मी काही शब्द सांगू इच्छितो : हिंदू समुदायाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.”

तो पुढे म्हणाला, “परंतु मी केलेल्या ट्वीटबद्दल विचार करीत असताना, मला असं वाटलं की व्यंगचित्र न जोडताही मी या घटनेबाबत बोलू शकलो असतो. मी दुखावलेल्या प्रत्येकाची अत्यंत नम्रतेने माफी मागू इच्छितो.”

“तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, मी सर्व धर्मांना सर्वोच्च मानतो. आपण सर्व जण आयुष्यात काही ना काही चूक करतो आणि आपल्या चुकांवर चिंतन करतो. ही माझी चूक होती,” असेही तो म्हणाला.

हेही वाचा… दिव्या अग्रवाल मराठमोळ्या बॉयफ्रेंडशी घरीच बांधणार लग्नगाठ; कारण सांगत म्हणाली, “५ स्टार हॉटेल…”

अलीकडेच झालेल्या मुलाखतीत विक्रांत मेस्सीने वैविध्यपूर्ण कुटुंबात वाढण्याबद्दल सांगितले. त्याच्या कुटुंबातील सदस्य विविध धर्मांचे पालन करतात.

दरम्यान, विक्रांतबाबत सांगायचे झाल्यास ’12th फेल’ चित्रपटामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यासाठी त्याला सर्वोत्कष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला. नुकताच विक्रांत बाबा झाला आहे आणि त्याचे पालकत्व तो एन्जॉय करतोय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikrant massey apologize due to editorial cartoon on shree ram and seeta dvr