Vikrant Massey on Retirement Post: ’12th फेल’ फेम बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने इन्स्टाग्रामवर सोमवारी (२ डिसेंबरला) एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्याने अभिनयातून निवृत्ती असल्याचे संकेत दिले होते. मात्र त्याने आता त्याच्या या सोशल मीडिया पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे. विक्रांतने तो अभिनयातून निवृत्ती घेत नसल्याचं म्हटलं आहे.

विक्रांत मॅसी शेवटचा ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दिसला होता. एका पोस्टमध्ये २०२५ नंतर अभिनयातून निवृत्त होत असल्याचे संकेत दिल्यानंतर विक्रांत म्हणाला की लोकांचा गैरसमज झाला आहे. न्यूज 8 शी बोलताना विक्रांतने स्पष्ट केलं की तो थकलाय, त्यामुळे त्याला मोठा ब्रेक हवा आहे. त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे तो काही काही काळ विश्रांती घेणार आहे.

Nana Patekar
हाऊसफुल शो; मुख्य नायिकेचा नवरा वारला अन्…; नाना पाटेकरांनी सांगितला नाटकाचा प्रसंग, म्हणाले, “पडदा बंद होत होता…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Bollywood Actors Salman Khan ex-girlfriend Somy Ali claimed that Sushant Singh Rajput was murdered
“सुशांत सिंह राजपूतची हत्याच केली”, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”
Nana Patekar recalls memories of smita patil
“स्मितामुळे मी सिनेमात आलो, नाहीतर…”, नाना पाटेकरांचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता? सांगितली ४६ वर्षांपूर्वीची आठवण
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश

हेही वाचा – “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा? म्हणाला, “शेवटचे दोन चित्रपट अन्…”

विक्रांत म्हणाला, “मी निवृत्ती घेत नाहीये… मी थकलो आहे. मला एक मोठा ब्रेक हवा आहे. घरची आठवण येत आहे आणि माझी प्रकृतीदेखील ठिक नाही. माझ्या पोस्टचा लोकांनी चुकीचा अर्थ काढला आहे.” विक्रांत निवृत्ती घेत नसून काही काळ अभिनयातून ब्रेक घेणार आहे.

विक्रांतने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

विक्रांतने लिहिलं, “माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे.”

हेही वाचा – “तुम्ही आज मरणार आहात”, म्हणत एक्स बॉयफ्रेंडला मैत्रिणीसह जिवंत जाळलं; आलिया फाखरी कोण आहे? वाचा

i

पुढे त्याने लिहिलं, “योग्य वेळ येऊपर्यंत, येत्या २०२५ मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचं भेटू. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी सोबत घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा काय ऋणी राहीन.”

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

दरम्यान, या पोस्टनंतर विक्रांतने सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह त्याच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी त्याने आपल्या ‘निवृत्ती’बाबतच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला होता. मात्र आज त्याने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.