बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सी ‘12th fail’ चित्रपटामुळे चर्चेत आला. त्यानंतर विक्रांत ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात झळकला होता. विक्रांतला यावर्षी एक गोंडस बाळदेखील झालं आणि ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. अशातच आता विक्रांतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत विक्रांत आणि एका टॅक्सी चालकामध्ये जबरदस्त भांडण सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ट्रक्सीचालक व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करतो आणि विक्रांतला म्हणतो, “सर जे भाडं इथे दिसतंय ते तुम्हाला द्यावं लागेल.” यावर विक्रांत म्हणतो. “जेव्हा निघालो होतो तेव्हा ४०० रुपये भाडं दाखवलं होतं?” मग टॅक्सीचालक म्हणतो, “म्हणजे तुम्ही भाडं नाही देणार?” विक्रांत भाडं देण्यास नाकारतो आणि म्हणतो, “मी का देऊ भाडं? आणि तू ओरडतोयस कशाला?”

हेही वाचा… ठरलं! सलमान खानच्या ‘सिकंदर’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची लागली वर्णी, चाहत्यांना गुड न्यूज देत म्हणाली…

यानंतर टॅक्सीचालक कॅमेरासमोर घडलेला किस्सा सांगतो आणि म्हणतो, “माझं नाव आशीष आहे, मी एक टॅक्सीचालक आहे. मी माझ्या पॅसेंजरला त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवलं आहे आणि ते मला आता पैसे द्यायला मनाई करतायत, माझ्याशी वाद घालतायत, शिव्या वगैरे पण देतायत.”

टॅक्सीचालकाचं बोलून झाल्यावर विक्रांत म्हणतो, “मी शिव्या देतोय? तू काय मला धमकी देतोयस? मी कायदेशीररित्या बोलतोय. अचानक पैसे कसे वाढले? हे असं नाही चालणार.” विक्रांत बोलत असतानाच टॅक्सीचालक त्याच्याशी वाद घालतो आणि म्हणतो, “का नाही चालणार सर, यात माझी थोडीना चूक आहे, ही अ‍ॅपवाल्यांची चूक आहे. ते मनमानी करतात, माझी थोडी चूक आहे.”

पुढे विक्रांत त्याला म्हणतो, “तुझी चूक आहे असं मी सांगतचं नाहीय. तूच सांगतोयस ना अॅपवाल्यांची मनमानी आहे. ही मनमानी कशी चालेल, ही चुकीची गोष्ट आहे की नाही.”

विक्रांत पैसे देत नाही आहे म्हटल्यावर टॅक्सीचालक त्याला म्हणतो, “सर तुम्ही एवढे पैसे कमावता, तुमच्याकडे खूप पैसे असतील, तरीपण तुम्ही माझ्याशी भांडताय.”

हेही वाचा… मुग्धा गोडसेच्या आईला मिळाली नामांकित रेस्टॉरंटमध्ये वाईट वागणूक; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या ७० वर्षांच्या आईची…”

“पैसे असतील, नसतील; ते माझे असतील, तुमचे असतील कोणाचेही असतील. मेहनतीचेच पैसे असतात ना आणि तूच सांगतोयस अॅपवाल्यांची मनमानी आहे, मग हे असं नाही चालायला पाहिजे. हे मला नाही चालणार”, असं विक्रांत त्याला म्हणतो.

हेही वाचा… “बुरी नजरवाले…”, आलिया भट्टने कानामागे लावला काजळाचा टिका; अभिनेत्रीचा मेट गालातील ‘तो’ फोटो व्हायरल

विक्रांतच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी कमेंट्स करत लिहिलंय की, “हे एका चित्रपटाचं प्रमोशन आहे.” तर काहींनी विक्रांतची बाजू मांडत लिहिलंय की, “तो बरोबर बोलतोय, यात विक्रांतची काहीच चूक नाही आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikrant massey disputes with taxi driver video viral dvr