विक्रांत मेस्सीचा सिनेमा ‘द साबरमती रिपोर्ट’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. विक्रांत सध्या सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. विविध चॅनल्सना विक्रांत मेस्सी मुलाखतीही देतो आहे. भाजपा, मुस्लिम आणि भारत यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विक्रांत मेस्सीने ( Vikrant Massey ) एक उत्तर दिलं ज्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होते आहे.
विक्रांत मेस्सीने काय म्हटलंय?
विक्रांतला प्रश्न विचारण्यात आला की तू तर भाजपावर टीका करायचास. आता तू भाजपाला पाठिंबा देणारा माणूस झाला आहेस. एक सेक्युलर माणूस कट्टर हिंदुत्ववादी कसा काय झाला? यावर विक्रांत मेस्सी म्हणाला, “ही बाब खरी आहे की मी भाजपाचा टीकाकार होतो. मात्र देशभरात फिरल्यानंतर मला हे समजलं की ज्या गोष्टी समोरुन वाईट दिसतात त्या वाईट नाही. लोक सांगायचे मुस्लिम या देशात असुरक्षित आहेत. मात्र कुणीही असुरक्षित नाही कुठल्याही मुस्लिमाला कसलाही धोका नाही. सगळं व्यवस्थित चाललं आहे. त्यामुळे मी आज सांगतो आहे की मी बदललो आहे.” असं विक्रांत मेस्सीने ( Vikrant Massey ) म्हटलं आहे.
विक्रांतचा व्हिडीओ व्हायरल टीकेचा भडीमार
विक्रांत मेस्सीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकाने लिहिलं आहे विक्रांत ( Vikrant Massey ) तुला घरवापसीच्या खूप खूप शुभेच्छा. सेक्युलर गँगमधून बाहेर पडणं कठीण असतं. नंतर एकाने विचारलं आहे भाई हे काय करतो आहेस? अनेकांनी विक्रांतचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. अनेकांनी विक्रांतचं वागणं योग्य आहे असं म्हटलं आहे. तर अनेकांनी तू मूर्खासारखं बोलतो आहे असंही म्हटलं आहे.
माझा भाऊ मुस्लिम आहे, वडील ख्रिश्चन आहेत-विक्रांत मेस्सी
विक्रांत मेस्सीने अनफिल्टर्ड विथ समदीशला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की माझे वडील ख्रिश्चन आहेत, आई शिख आणि मोठा भाऊ मुस्लिम आहे. माझ्या मोठ्या भावाचं नाव मोइन आहे. १७ व्या वर्षीच त्याने इस्लाम स्वीकारला होता. असंही विक्रांतने या मुलाखतीत सांगितलं. द साबरमती रिपोर्ट सिनेमात विक्रांत मुख्य भूमिकेत आहे. तर या सिनेमात राशी खन्ना आणि रिद्धि डोग्रा या दोन अभिनेत्री आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन धीरज सरनाने केलं आहे.
हे पण वाचा- विक्रांत मेस्सीसह एकाच बॉलीवूड चित्रपटात झळकणार प्रसाद ओक अन् छाया कदम! सिनेमा कधी व कुठे पाहता येणार?
साबरमती रिपोर्ट हे नाव काय दिलं?
साबरमती रिपोर्ट हा वेगळा सिनेमा आहे. त्यात एकच पैलू दाखवलेला गेलेला नाही. आजवर कुणीही कोच ६ आणि ७ बाबत काय झालं ते सांगितलं नाही. जेव्हा दंगे झाले होते तेव्हा खूप नरेटिव्ह चालवण्यात आले. काय घडलं ते कुणालाच ठाऊक नाही. मी जेव्हा ही गोष्ट मी माझ्या घरात सांगितली तेव्हा २७ फेब्रुवारीला झालं काय ? ते कुणालाच माहीत नाही. ५९ लोक फक्त एक संख्या बनून राहिले आहेत. कुणालाही त्यांची नावंही ही माहित नाही. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही हा सिनेमा घेऊन येत आहोत. त्यामुळे आम्ही साबरमती रिपोर्ट असं नाव या सिनेमाला ठेवलं आहे. असं विक्रांत मेस्सी ( Vikrant Massey ) याने म्हटलं आहे.
चित्रपट प्रपोगंडा आहे का ?
आमचा चित्रपट प्रपोगंडा आहे का? हा प्रश्न विचारला जातो आहे. मात्र याचं मी एकच उत्तर देईन की तुम्ही हा सिनेमा जाऊन बघा. सोशल मीडियावर तुम्ही एकतर डाव्या विचारसरणीचे असता किंवा उजव्या. बाकी मध्य काही नाहीच असंही विक्रांत मेस्सीने म्हटलं आहे. आम्ही मानवीय नजरेने हा चित्रपट तयार केला आहे. ५९ लोकांबाबत कधीही कुणीही बोललेलं नाही. आम्ही जे सांगितलं आहे त्या गोष्टी सिनेमा पाहिल्यावरच कळेल असं विक्रांतने ( Vikrant Massey ) म्हटलं आहे.