Vikrant Massey : बॉलीवूडमध्ये काम मिळवायचे म्हणजे डोक्यावर गॉड फादरचा हाथ असावा लागतो. बॉलीवूडमधील अनेक सुपस्टारचे गॉड फादर आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने काम मिळवणे फार सोपे आहे. मात्र आपल्याला कुणाचाही आधार नसताना मनोरंजनाच्या या मायावी जगात स्वत:चे हक्काचे स्थान निर्माण करणे फारच कठीण आहे. अशात बॉलीवूडमध्ये असेही अनेक अस्सल कलाकार आहेत; ज्यांनी कुणाचीही मदत न घेता स्वत:च्या हिंमतीवर आपली नवी ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक विक्रांत मॅसी. विक्रांत बॉलीवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. मात्र यशाचं शिखर गाठताना त्याला बरीच कसरत करावी लागली. विक्रांतचे बालपण फार हालाखीच्या परिस्थितीत गेले. नुकतीच त्याने ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याच्या कुटुंबाने कोणत्या हालअपेष्टा सहन केल्या हे सांगितले.

विक्रांतने मुलाखतीत सांगितले की, त्याचे आई बाबा आधी कपूर परिवाराचे शेजारी होते. मात्र काही कौटुंबिक कलह झाल्याने त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. “आई, बाबा, मी आणि भाऊ सर्वांना घरातून बाहेर काढलं होतं. दुसरं हक्काचं घर नसल्याने मला कुटुंबासह गोदाममध्ये रहावं लागलं. त्यावेळी माझा भाऊ फार लहान होता.”, असे विक्रांत म्हणाला.

Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
Amit thackeray and mitali thackeray
Amit Thackeray Love Story : “मी पोद्दारचा, ती रुईयाची, ती ज्या मुलाला बघायला जायची…”; अमित ठाकरेंनी सांगितली लव्हस्टोरी!
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
Amit Thackeray and Mitali Thackeray
Amit Thackeray : “मला वाटलेलं मिताली…”, निवडणुकीच्या प्रचाराबाबत अमित ठाकरे पत्नीच्या पाठिंब्याविषयी काय म्हणाले?
sapna choudhary baby name
Bigg Boss फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, बाळाच्या नामकरण सोहळ्याला ३० हजार लोकांची उपस्थिती
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न

आई जेवणाच्या डब्ब्यांचे काम करायची

विक्रांतने पुढे त्याच्या आईने केलेल्या कष्टाची सुद्धा आठवण काढली. त्याने म्हटलं की, माझ्या आईने आमचं घर चालवण्यासाठी फार मेहनत घेतली. ती लोकांसाठी जेवणाचे डब्बे बनवून देत होती. त्यासाठी ती पहाटे ३ वाजता उठायची. त्यानंतर ४ वाजता स्वयंपाकाला सुरुवात करायची. बरोबर ६ वाजता एकूण २० व्यक्तींना जेवणाचे डब्बे द्यावे लागत होते. डब्बे तयार झाले की डब्बेवाला ते घेऊन जायचा. तसेच पुढे ४ ते ७ पर्यंत ती मुलांना शिकवायची. त्यानंतर घरातील कामे, स्वयंपाक, साफसफाई या सर्व गोष्टी करून रात्री झोपण्यासाठी आईला १२ किंवा १ सुद्धा वाजत होते.”

हेही वाचा : ८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न

वडिलांनी नोकरी सोडली

विक्रांतचे वडील एका कंपनीत काम करत होते. मात्र त्यांनी लवकरच स्वत:ची नोकरी सोडली. त्याची कारणे सांगताना विक्रांत म्हणाला की, नोकरी सोडण्यामागे दोन कारणे आहेत. माझे वडील फार निष्ठावंत होते. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच कंपनीत काम केले. तेथील बॉसबरोबर त्यांची छान मैत्री झाली होती. मात्र अचानक बॉसला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यामुळे कंपनीचा पदभार बॉसच्या पत्नीकडे गेला. माझे वडील बॉस आणि मित्र गेल्याने दु:खी होते. त्यांनी थोडावेळ घरी आराम केला आणि काही दिवसांनी कामावर गेले. मात्र त्यांना आधीसारखी वागणूक तेथे मिळाली नाही. त्यावेळी माझ्या भावाला कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली होती आणि मलादेखील एक काम मिळालं होतं. त्यामुळे बाबांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : “माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबत खुलासा

विक्रांतने आयुष्यात अनेक चढउतार पाहीले. त्यामुळे आयुष्यावर बोलताना मुलाखतीत पुढे तो म्हणाला की, आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपासाठी नसते. आज ते आहे ते उद्या नसणार. त्यामुळे आज जे आहे त्यात आपण जगले पाहिजे. उद्या माझ्या आयुष्यात पुन्हा अशी परिस्थिती आली तरी मी त्यावर मात करेन. असा विश्वासदेखील विक्रांतने यावेळी व्यक्त केला.