Vikrant Massey On Career Break post : अभिनेता विक्रांत मॅसीने ’12th फेल’, ‘हसीन दिलरुबा’ आणि नुकत्याच आलेल्या ‘साबरमती रिपोर्ट’ या सिनेमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली. एकामागोमाग एक सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता विक्रांत मॅसीने २ डिसेंबर २०२४ रोजी तो अभिनयातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे अनेकांना धक्का बसला. पण विक्रांतने दुसऱ्या दिवशी त्याने केलेली पोस्ट ही कायमच्या निवृत्तीबद्दल नसून तो काही काळ सिनेमातून ब्रेक घेणार आहे असे त्याने जाहीर केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता विक्रांतने त्याने ती पोस्ट का केली आणि त्याच्या करिअरच्या पुढील योजना काय आहेत यावर सविस्तर भाष्य केले आहे. ‘आजतक’शी बोलताना विक्रांतने सांगितले की, “सोशल मीडिया प्रेशर हे कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर करण्यामागील एक महत्त्वाचा भाग होता.” तसेच, त्याने सांगितले की त्याला शेवटी त्याच्या स्वप्नातील जीवन मिळाले, त्यामुळे “त्या आयुष्याचा आनंद घेण्याची वेळ आली होती.” असे त्याने स्पष्ट केले.

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात का घेतले शाहरुख खानचे नाव? जाणून घ्या

सोशल मीडिया प्रेशरचा विक्रांतच्या निर्णयावर प्रभाव

विक्रांत म्हणाला, “मी नेहमी ज्या आयुष्याची स्वप्ने पाहिली होती, ते शेवटी मला मिळाले. त्यामुळे मला वाटले की आता ते जगण्याची वेळ आहे. म्हणून मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी पुढच्या वर्षी फक्त एकच चित्रपट करणार आहे. सोशल मीडिया प्रेशरने कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर करण्यास प्रवृत्त केले, हे मी मान्य करतो. मी एक सार्वजनिक व्यक्ती (पब्लिक फिगर) आहे. त्यामुळे मला काही गोष्टींची माहिती सोशल मीडियावर शेअर करावीच लागते. मी स्वभावाने थोडा अंतर्मुख (इन्ट्रोव्हर्ट) असलो तरीही मला सोशल मीडियावर यावेच लागते. पण जर मला पर्याय दिला गेला तर मी फक्त आवश्यक वाटल्यावरच काही गोष्टी शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर येईन.”

विक्रांत पुढे म्हणाला, ” माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर मी त्याच्याबरोबर आणि माझ्या पत्नीबरोबर वेळ घालवू शकलो नाही. म्हणूनच, मी त्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की अभिनेता, मुलगा, वडील आणि पती म्हणून, मला माझ्या आयुष्याला नव्याने समजून घेण्याची आणि संतुलन साधण्याची गरज होती. पुढे एक कलाकार म्हणून स्वतःमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी माझा प्रयत्न असेल,” असे त्याने पुढे नमूद केले.

हेही वाचा…Video : अमिताभ बच्चन यांच्या नातवाला रेखा यांनी मारली मिठी, आपुलकीने अगस्त्य नंदाच्या चेहऱ्यावरून फिरवला हात; पाहा व्हिडीओ

विक्रांतचा अभिनयातून ब्रेक

विक्रांतने अभिनयातून काही काळ ब्रेक घेणार असे जाहीर करण्याच्या आधी त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो अभिनयातून काही काळ ब्रेक घेत आहे हे जाहीर करताना इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विक्रांतने लिहिले होते,“माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे.”.

हेही वाचा…‘करिश्मा का करिश्मा’ फेम झनक शुक्लाने बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे तिचा पती, काय करतो?

विक्रांतचा आगामी चित्रपट

अभिनयातून काही काळ ब्रेक घेतल्याची घोषणा केल्यानंतर विक्रांतला डेहराडून येथे ‘आंखों की गुस्ताखियां’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहण्यात आले. या चित्रपटात विक्रांतबरोबर शनाया कपूर दिसणार आहे. हा चित्रपट ‘प्रेम’ आणि ‘घोस्टिंग’ या संकल्पनेवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सिंग करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikrant massey opens up on career break and related social media post psg