अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं. बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्येही तिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्मिता विन डिझेल याच्याबरोबर ‘ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ जेंडर केज’ या अमेरिकन ॲक्शन चित्रपटात दीपिकाने प्रमुख भूमिका साकारली होती. या अभिनेत्याने आता त्याच्या सोशल मीडियावर दीपिकाबरोबरचा फोटो शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विन डिझेलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो दीपिकाला फर जॅकेट घालताना दिसतोय. ‘ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ जेंडर केज’ चित्रपटाचे दिग्दर्शक डीजे कारुसो, या फोटोत ऑटोरिक्षाच्या चालकाच्या सीटवर बसलेले दिसत आहोत.

फोटोला कॅप्शन देत विन डिझेलने लिहिले, “माझ्याबरोबर एकापेक्षा जास्त वेळा काम करू इच्छिणाऱ्या दिग्दर्शकांबद्दल मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला नेहमीच नम्र वाटतं. दीपिकाला वचन दिल्याप्रमाणे मी भारतात गेलो तेव्हाचा हा एक फोटो आहे. त्यावेळी मी दिग्दर्शक डीजे कारुसोबरोबर होतो. आम्ही निर्मितीच्या कामात व्यस्त असताना डीजेने मला पाठवलेली स्क्रिप्ट माझ्या मुलीने वाचली, तेव्हा ती रडली. ती का रडली याबद्दल मी तिला विचारलं, यावर ती म्हणाली, यात एका भावा आणि बहिणीची गोष्ट आहे जी खूप खरी वाटते आणि भावनिकसुद्धा आहे.”

हेही वाचा… आलिशान घर, लक्झरी गाड्यांचं कलेक्शन अन्…; तापसी पन्नू आहे कोट्यवधींची मालकीण

प्रेक्षकांना विचारत विन पुढे म्हणाला, “जर माझी मुलगी स्क्रिप्ट वाचून रडली आणि असे चित्रपट मी बनवू शकलो तर माझ्या बहिणीची भूमिका कोण करू शकेल, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तिने जेनिफर लॉरेन्स हे नाव सुचवले, तुमचे मत काय आहे.”

हेही वाचा… तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या लग्नाला एक महिना पूर्ण; बहीण खुशबू फोटो शेअर करत म्हणाली…

विन डिझेल शेवटचा दिग्दर्शक लुईस लेटरियरच्या ‘फास्ट एक्स’ (२०२३) चित्रपटामध्ये दिसला होता, तर, दीपिका पदुकोण सिद्धार्थ आनंदच्या एरियल ॲक्शन चित्रपट ‘फायटर’मध्ये झळकली होती. या चित्रपटात हृतिक रोशन, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vin diesel shared photo with deepika padukone on social media dvr