सलमान खान उत्तम अभिनेता आहेच, पण तो त्याच्या मदत करणाऱ्या स्वभावामुळेही ओळखला जातो. त्याची ‘बिइंग ह्यूमन’ ही संस्था गरीब मुलांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी मदत करते. सलमानच्या उदारतेबद्दल इंडस्ट्रीत अनेकजण बोलत असतात. आता सलमानचा कॉलेजच्या दिवसांपासून जवळचा मित्र असलेल्या विंदू दारा सिंगने अभिनेत्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
“सलमान सांगायचा की माझी शरीरयष्टी पाहून त्याने जास्त व्यायाम करायला सुरुवात केली आणि मी त्याला नेहमी म्हणायचो की तो खूपच जास्त व्यायाम करतोय. इतकंच नाही तर तो जेवतोही जास्तच. तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा व्यायाम करतो,” असं विंदू सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. सलमान खानच्या आहाराबद्दल व व्यायामाबद्दल विंदू दारा सिंगने हे विधान केलं आहे.
“एका बापाला आणखी काय हवं?” लेकीच्या ‘या’ कामगिरीवर भारावले शरद पोंक्षे; म्हणाले, “आधी पायलट अन्…”
“तो जेवढं खातो, ते पाहून जर आपण विचारलं, ‘भाई, हे सगळं जेवण कुठे जातं?’ तो नेहमी उत्तर देतो की तो जाळून टाकतो आणि खरंच संध्याकाळच्या व्यायामादरम्यान तो तेच करतो,” असं विंदू म्हणाला. “सलमान एक अद्भुत आत्मा असलेली व्यक्ती आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, तो खूप मदत करणारा माणूस आहे,” असं विंदूने नमूद केलं.
“सलमानचे वडील सलीम खान त्याला रोज पैसे द्यायचे. हे पैसे ते सलमानचा मदतनीस नदीमला द्यायचे. पण शेवटी सलमानचा काय खर्च आहे? त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जे काही दिलं मग ते ५० हजार असो, एक लाख असो ते सर्व पैसे तो गरिबांना दान करायचा. आणि त्याने केलेल्या या मदतीचे आशीर्वाद आजही त्याच्याबरोबर आहेत. तो आताही दर महिन्याला किमान २५-३० लाख रुपयांची देणगी देतो,” असा खुलासा विंदूने केला. सलमान खान आजही त्याचे वडील जे पैसे त्याच्या मदतनीसला देतात, त्यावरच जगतो, त्याच्याकडे कधीच रोख रक्कम नसते, असंही विंदूने सांगितलं.
१७ व्या वर्षी सोडलं घर, चाळीत राहून केला संघर्ष, नकारामुळे आत्महत्येचे विचार अन् आता…
“सलमानकडे ब्लँक कार्ड आहे. त्याच्याकडे कधीच पैसे नसतात कारण त्याला गरज नसते. सलमान स्वतःचे पैसे कधीच स्वतः सांभाळत नाही, त्याला मिळणारे पैसे दुसरा माणूस हाताळतो. या पैशातून त्याने किती गरीब लोकांना मदत केली असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. बिइंग ह्युमन संस्था खूप नंतर आली, पण तो आधीपासूनच उदार मनाचा आहे, तो लोकांना खूप करतो,” असं विंदू दारा सिंग म्हणाला.