विंदू दारा सिंग हे लोकप्रिय अभिनेते आहेत. ९० च्या दशकापासून ते अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. विंदू यांनी तब्बूची बहीण व अभिनेत्री फराह नाझबरोबर १९९६ साली आंतरधर्मीय लग्न केलं होतं. त्यांना १९९७ मध्ये मुलगा झाला, त्याचं नाव फतेह रंधवा आहे. लग्नानंतर अवघ्या सहा वर्षांत विंदू व फराह विभक्त झाले. आता एका मुलाखतीत विंदू यांनी फराह व घटस्फोटाबाबत विधान केलं आहे.

विंदू दारा सिंग यांनी नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीत विंदू यांनी खुलासा केला की त्यांचे दिवंगत वडील दारा सिंग यांनी त्यांना दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करण्यापूर्वी दोनदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. विंदू म्हणाले, “ते नेहमी जे काही म्हणायचे तर बरोबर असायचं. मला आठवतंय की मी फराहच्या प्रेमात पडलो होतो आणि आम्ही लग्न करणार होतो आणि बाबा म्हणाले, ‘विंदू, नीट विचार कर. प्रेमापर्यंत ठीक आहे, पण लग्न झाल्यावर काही गोष्टी थोड्या कठीण असतात. मी म्हणालो, ‘नाही बाबा, काही कठीण नाही’, कारण आम्ही दोघे प्रेमात होतो आणि आम्हाला धर्माची फारशी पर्वा नव्हती.”

लग्नानंतर कळालं की या प्रकरणात माझ्या वडिलांचं म्हणणं बरोबर होतं. एखाद्या गोष्टीत धर्म आला की मग सगळी समीकरणं बदलतात, असं विदू यांनी नमूद केलं. “पण नंतर मला जाणवलं की वडिलांनी जे सांगितलं होतं ते बरोबर होतं. धर्म मधे आला की परिस्थिती बदलते, समीकरणं बदलतात. म्हणूनच हिंदू आणि मुस्लिमांनी लग्न करणे योग्य नाही, असं म्हटलं जातं. आंतरधर्मीय नात्यात भविष्यात दोन जोडीदारांपैकी एक जरी धार्मिक झाला तर दुसऱ्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं,” असं विंदू म्हणाले.

“तिने मला जवळ ओढलं अन्…”, विजय वर्माने सांगितला सारा अली खानसोबत इंटिमेट सीन करण्याचा अनुभव

फराहशी लग्न करण्याचे फायदे व नुकसान दोन्ही होते, असं विंदू यांनी नमूद केलं. “वडिलांचे ते शब्द अजूनही मला आठवतात. पण त्या लग्नापासून माझा एक सुंदर मुलगा आहे आणि माझ्या फराहबरोबरच्या गोड आठवणी आहेत, ज्या मी आजही जपतो. आम्ही मित्र आहोत आणि मला एक मुलगा आहे, यापेक्षा चांगलं काय असू शकतं. मी फराहसोबत घालवलेली ४-५ वर्षे खूप छान होती,” असं ते म्हणाले.

“फराहने कधी धर्माची पर्वा केली नाही. आमच्या कुटुंबातील कोणीही धूम्रपान करत नाही, पण ती सिगारेट ओढायची. मी तिला सिगारेट सोडायला सांगायचो, एके दिवशी ती मला म्हणाली, ‘तुम्ही मला हजला पाठवले तर मी सिगारेट सोडेन.’ मग मी सगळी तयारी करून तिला हजला पाठवलं, पण तिथून परत आल्यावर ती पूर्णपणे वेगळी स्त्री होती. ती बरीच बदलली होती आणि तिथूनच आमच्यातील गोष्टी बिघडू लागल्या,” असं विंदू यांनी सांगितलं.

Video: मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दणक्यात साजरा झाला आलिया भट्टचा वाढदिवस, अंबानी कुटुंबाने लावली हजेरी

घटस्फोटानंतर सहा महिने फराहने मला मुलगा फतेहला भेटू दिलं नव्हतं, असा खुलासा विंदू यांनी केला. मी गोष्टी सहज विसरतो आणि सध्या दोघांमध्ये कटुता नाही. फराह खूप चांगली आई आहे, अशा शब्दांत विंदू दारा सिंग यांनी पहिली पत्नी फराहचं कौतुक केलं.

Story img Loader