६०-७० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि मिथुन चक्रवर्ती हे कलाकार मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवत होते. त्याचवेळी बॉलिवूडमध्ये एका अशी कलाकाराने खलनायकाच्या भूमिकेतून एंट्री केली ज्याने पुढच्या काही वर्षांमध्ये सर्वांनाच मागे टाकलं. हा अभिनेता हाते विनोद खन्ना. अभिनेते सुनील दत्त यांनी विनोद खन्ना यांना १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन का मीत’ या चित्रपटातून लॉन्च केलं होतं. विनोद खन्ना यांनी १९७१ पर्यंत चित्रपटांमध्ये फक्त खलनायकांच्या भूमिका साकारल्या आणि नंतर त्यांनी नायकाच्या भूमिका मिळाल्या.

विनोद खन्ना फक्त त्यांचे चित्रपट आणि लोकप्रियतेमुळेच नाही तर त्यांच्या बोल्ड विचारांमुळेही अनेकदा चर्चेत राहिले होते. एकदा एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या इच्छांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यात इंटिमेट रिलेशनशिप म्हणजेच शरीरसंबंधाचं महत्त्व किती आहे हे सांगितलं होतं. या मुलाखतीत विनोद खन्ना यांनी, ‘मी कोणी संत नाही, जो कोणत्याही महिलेवर प्रेम करणार नाही किंवा तिच्याबरोबर सेक्स करणार नाही.’ असंही वक्तव्य केलं होतं.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

आणखी वाचा- “मी नाही म्हणायला हवे होते पण…”, माधुरी दीक्षितने केले विनोद खन्नांसोबतच्या किसिंग सीनवर भाष्य

विनोद खन्ना यांच्या या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये विनोद खन्ना यांनी सेक्सची गरज आणि त्यांच्या आयुष्यातील महिला याबद्दल बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात, “मी एक बॅचलर होतो आणि महिलांबद्दल बोलायचं तर मी काही संत नाही. मलाही सेक्स किंवा शरीरसंबंधांची तेवढीच गरज आहे जेवढी इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला असेल. महिला नसत्या तर आज आपण इथे नसतो. शरीरसंबंध नसते तर आज आपण इथे नसतो. तर मग माझे महिलांशी संबंध असण्यावरच आक्षेप का घेतला जावा.”

पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या विनोद खन्ना यांनी मुंबईत आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला शिफ्ट झाले. १९६० मध्ये विनोद खन्ना यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. तिथे त्यांनी ‘सोलहवां साल’ आणि ‘मुगल-ए-आजम’ हे चित्रपट पाहिले. चित्रपट पाहताच विनोद खन्ना त्याच्या प्रेमात पडले. जेव्हा विनोद खन्ना कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्याची ओळख गीतांजली नावाच्या मुलीशी झाली. विनोद खन्ना गीतांजलीच्या प्रेमात पडले. विनोद खन्ना आणि गितांजली यांनी १९७१ मध्ये लग्न केलं. या दोघांना अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही दोन मुलं आहेत. पण गितांजलीलाही त्यांनी काही वर्षांनी घटस्फोट दिला आणि कविता यांच्याशी लग्न केलं होतं.

आणखी वाचा- डिंपल कपाडिया यांना ऑनस्क्रीन Kiss करत होते विनोद खन्ना, दिग्दर्शकाने कट म्हटलं अन्…

विनोद खन्ना यांचे केवळ विचारच बोल्ड नव्हते तर मोठ्या पडद्यावरही खूप बोल्ड होते. अशा अनेक चित्रपटांचे किस्से आहेत, जेव्हा रोमँटिक किंवा इंटिमेट सीन शूट करताना विनोद खन्ना यांचा तोल गेला होता. ‘दयावान’ चित्रपटात माधुरी दीक्षितबरोबर शूट करण्यात आलेला सीन, ‘हमशक्ल’मधील मीनाक्षी शेषाद्रीबरोबरचा सीन, तसेच ‘प्रेम धर्म’मधील अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याबरोबरचा इंटिमेट हे किस्से बरेच चर्चेत होते. या सीनवरून वादही झाले होते. विनोद खन्ना बोल्ड अभिनेते असले तरीही ते कधीच कोणत्या मोठ्या वादात फसले नाहीत. २०१७ मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं.

Story img Loader