दिवंगत अभिनेता विनोद खन्ना एकेकाळचे सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अमर अकबर अँथनी’, ‘राजपूत’, ‘द बर्निंग ट्रेन’ आणि ‘कुर्बान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९६८ मध्ये ‘मेरे अपने’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांनी करिअर यशाच्या शिखरावर असताना आध्यात्मिक गुरु ‘ओशो रजनीश’ यांच्या सेवेसाठी बॉलिवूडमधून ५ वर्षांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. बॉलिवूडमध्ये परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व निर्माता आणि दिग्दर्शक मित्रांशी संपर्क केला. ज्यापैकी एक महेश भट्ट हेही होते. महेश भट्ट यांनी विनोद खन्ना यांना त्यांच्या आगामी दोन चित्रपटांसाठी कास्ट केलं.
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी विनोद खन्ना यांनी ‘जुर्म’ आणि ‘प्रेम धर्म’ या चित्रपटांसाठी साइन केलं होतं. यापैकी ‘प्रेम धर्म’ चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना कास्ट करण्यात आलं होतं. मोठ्या ब्रेकवरून परत आल्यानंतर विनोद खन्ना यांच्या हातात बरेच प्रोजेक्ट होते. त्यामुळे ते दोन शिफ्टमध्ये काम करू लागले होते. एक दिवस महेश भट्ट यांनी विनोद खन्ना यांच्याबरोबर रात्रीच्या शिफ्टमध्ये ‘प्रेम धर्म’चं शूटिंग करायचं ठरवलं. हा एक इंटिमेट सीन होता. ज्यात विनोद खन्ना यांना झोपायला जाण्याआधी डिंपल कपाडिया यांना किस करून मिठीत घ्यायचं होतं.
आणखी वाचा- “देवेंद्रजी जिंकू शकत नाही…” बिग बॉसच्या घरात असं का म्हणाल्या अमृता फडणवीस?
काही रिपोर्ट्सनुसार विनोद खन्ना शूटिंगसाठी सेटवर पोहोचले आणि त्यांनी कॉस्ट्यूम बदलून डिंपल यांच्यासह बेडवर आपली पोझिशन घेतली. सीन शूटिंगसाठी तयार होता. महेश भट्ट यांनी अॅक्शन म्हणून शूटिंग सुरुवात केली. विनोद खन्ना यांनी डिंपल यांना अनेकदा किस केलं आणि त्यांना मिठीत घेतलं. पण महेश भट्ट यांनी या सीनचा आणखी एक शॉट घेण्याचं ठरवलं. पण तो आणखी परफेक्ट व्हावा यासाठी त्यांनी एक लॉन्ग शॉट घेतला. यावेळी महेश भट्ट आणि संपूर्ण टीम थोडी दूर थांबली. सीन शूट होत असताना विनोद खन्ना यांनी दिग्दर्शकांच्या सूचनांचं पालन केलं. ते डिंपल यांना किस करू लागले आणि नंतर त्यांना मिठीत घेतलं. सीन पूर्ण झाला आणि महेश भट्ट यांनी कट म्हटलं. पण त्यांचा आवाज विनोद खन्ना यांच्यापर्यंत पोहोचला नाही. ते डिंपल यांना किस करत राहिले.
आणखी वाचा- “मी नाही म्हणायला हवे होते पण…”, माधुरी दीक्षितने केले विनोद खन्नांसोबतच्या किसिंग सीनवर भाष्य
महेश भट्ट यांनी कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना डिंपल यांना वारंवार किस करून मिठीत घेत राहिले. त्यांच्या या कृतीने डिंपलही हैराण झाल्या होत्या. त्यांच्याबरोबर काय होतंय हे त्यांना कळतच नव्हतं. अखेर महेश भट्ट आणि टीम सीनच्या सेटवर पोहोचले आणि जोरात ‘कट कट कट’ असं ओरडले. तेव्हा कुठे विनोद खन्ना भानावर आले आणि त्यांनी डिंपल यांना सोडलं. विनोद खन्ना यांच्या वागण्यानं डिंपल कपाडिया यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्या रडत रडत मेकअप रुममध्ये पोहोचल्या. दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार, महेश भट्ट यांनी या घटनेनंतर विनोद खन्ना यांना डिंपल कपाडिया यांची माफी मागायला लावली होती. विनोद खन्ना यांनीही माफी मागत, त्यावेळी ते नशेत होते आणि स्वतःवरच नियंत्रण सुटल्याने असं घडल्याचं मान्य केलं.