बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरा एकेकाळी बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कलाकारांपैकी एक होते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये लाहोर येथे झाला होता. त्यांनी जवळपास ३ दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. या कारकिर्दीत त्यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केलं. विनोद मेहरा यांनी त्यांच्या बॉलिवूड करिअरमध्ये बऱ्याच प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर काम केलं आणि त्याचं नावही बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यांच्या करिअरपेक्षा लव्ह लाइफ जास्त चर्चेत राहिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोद मेहरा यांनी अभिनेत्री रेखा यांच्याबरोबर सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि एकत्र काम करता करता दोघांमध्ये जवळीक वाढली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि त्यांचं हे नातं पुढे लग्नपर्यंत पोहोचलं. पण रेखा यांच्याशी लग्न करूनही ते त्यांनी कधीच पत्नीचा दर्जा देऊ शकले नाही. त्या दोघांच्या अफेअरच्या तर बऱ्याच चर्चा झाल्या मात्र रेखा किंवा विनोद मेहरा यांच्यापैकी कोणीच कधीच त्यांच्या सिक्रेट मॅरेजबद्दल बोललं नाही.

आणखी वाचा- “त्यांच्यासाठी मी बदनाम अभिनेत्री…” विनोद मेहरांच्या आईबाबत रेखा यांनी केला होता खुलासा

लेखक उस्मान यासीर यांनी ‘रेखा एन अनटोल्ड स्टोरी’ या त्यांच्या पुस्तकात या लग्नाचा उल्लेख करेपर्यंत रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाची पुष्टी झाली नव्हती. या पुस्तकात या लग्नाचा उल्लेख करताना उस्मान यासीर यांनी लिहिलंय की, विनोद मेहरा यांनी एका खासगी कार्यक्रमात रेखा यांच्याशी कोलकातामध्ये लग्न केलं. मात्र विनोद मेहरा यांच्या आईने रेखा यांनी कधीच आपली सून म्हणून स्वीकारलं नाही. जेव्हा विनोद मेहरा रेखा यांना घेऊन घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या आईने रेखा यांचा खूप अपमान केला.

आणखी वाचा- सिद्धार्थ- कियारा रिसेप्शनमधील ‘त्या’ व्हिडीओमुळे आलिया होतेय ट्रोल, नेटकरी म्हणाले, “स्वतःच्या लग्नात…”

रेखा यांनी विनोद मेहरा यांच्या आईला समजावण्याचा बराच प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणाचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि रेखा यांना घरातून बाहेर काढलं. त्यानंतर रेखा आणि विनोद मेहरा वेगळे झाले आणि विनोद मेहरांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी दुसरी मुलगी शोधण्यास सुरुवात केली. एकीकडे त्यांच्या खासगी आयुष्यात वादळ उठलं होतं. तर दुसरीकडे व्यावसायिक आयुष्यात मात्र त्यांनी यशाचं शिखर गाठलं होतं. अशातच विनोद मेहरा यांच्या आईने त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं. लग्नानंतर काही दिवसांनंतर विनोद मेहरा यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला.

आणखी वाचा- रेखाने शेवटच्या श्वासापर्यंत विनोद मेहराची साथ सोडली नाही, पत्नीने केला मोठा खुलासा

विनोद मेहरा यांनी आपल्या सर्व परिस्थितीसाठी दुसऱ्या पत्नीला जबाबदार ठरवलं. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा येऊ लागला. पत्नीशी वाद आणि दुराव्याच्या दरम्यान विनोद मेहरा यांनी त्यांची सहकलाकार बिंदिया गोस्वामीला डेट करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि नंतर त्यांनी गुपचूप लग्न केलं. पण जेव्हा त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली तसं विनोद मेहरा यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली.

बिंदिया गोस्वामी विनोद मेहरा यांच्या दुसऱ्या पत्नीच्या धमक्यांनी एवढी घाबरली होती की नंतर ती हॉटेलमध्ये राहू लागली. अखेर या सगळ्याला कंटाळून बिंदिया विनोद मेहरा यांच्यापासून वेगळी झाली आणि तिने जेपी दत्ता यांच्याशी लग्न केलं. बिंदियाच्या या निर्णयामुळे विनोद खन्ना यांना धक्का बसला. त्यांना सगळ्याचा त्रास होत असतानाही ते एकटे राहिले पण दुसऱ्या पत्नीकडे परत गेले नाहीत. दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर १९८८ मध्ये विनोद मेहरा यांनी किरण यांच्याशी लग्न केलं आणि वैवाहिक आयुष्यात व्यग्र झाले. पण लग्नानंतर दोन वर्षांतच त्यांना पुन्हा हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod mehara birth anniversary know about his love life mrj