सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करीत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. एकही स्टार नसूनही या चित्रपटाने १५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ३२००० मुली या आकड्यावरून प्रचंड गहजब झाला होता. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरमधून केरळमधील ३२००० हिंदू महिलांना आयसीसमध्ये जबरदस्ती भरती केल्याचा दावा करण्यात आला होता. यावरून चांगलाच वाद चिघळला आणि नंतर त्या ३२००० ऐवजी तीन मुलींची कहाणी असा यात बदल करण्यात आला.

maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी

आणखी वाचा : शाहरुख नव्हे तर ‘हा’ अभिनेता साकारणार ‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिका; प्रसिद्ध समीक्षकाचा खुलासा

सोशल मीडियावर सगळीकडे हा बदल करण्यात आला. नुकतंच एका पत्रकार परिषदेत निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी यावर भाष्य केलं आहे. याबद्दल ते म्हणाले, “आम्ही भरपूर मुलींशी भेटून प्रत्यक्ष संवाद साधला आहे त्यामुळे ३२००० विरुद्ध ३ हा आमच्यासाठी मुद्दा नाही. आमच्या चित्रपटाची कहाणी या ३ मुलींच्या जीवनावर आधारित आहे. जे केरळमध्ये सुरू आहे त्याचा या आकड्याशी काही एक संबंध नाही. या तीन मुलींच्या माध्यमातून आम्ही हजारो मुलींची दुःखद कहाणी तुमच्यासमोर आणली आहे. जेव्हा आमच्या चित्रपटाला खाली खेचण्याचा प्रयत्न झाला, त्यात काही मीडियातील लोकांनीही साथ दिली, त्याबद्दल मला खेद आहे.”

पुढे विपुल शाह म्हणाले, “कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्यांना पाठिंबा द्यायचा सोडून काही लोक चित्रपटाला बदनाम करू पाहत होते, खोटं ठरवू पाहत होते. आत्ता परत हा आकडा ७००० वर आला आहे. लवकरच आम्ही या संदर्भात माहिती गोळा करून पुराव्यांसह आम्ही यांचं पितळ उघडं पाडू. माझी फक्त एकच विनंती आहे की या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करा.” बॉक्स ऑफिसवर ‘द केरला स्टोरी’ने इतिहास रचला आहे, लवकरच हा चित्रपट २०० कोटींचा टप्पाही पार करेल.