कलाक्षेत्रामधील नावाजलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. विराट व अनुष्का बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स पुरस्कार सोहळ्याला दोघांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यामध्ये या दोघांनी एण्ट्री करताच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुरस्कार सोहळ्यादरम्यान विराट व अनुष्काने खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले.
विराट व अनुष्काला या पुरस्कार सोहळ्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दोघांनीही याची अगदी खरी उत्तरं दिली. पार्टीमध्ये डान्स फ्लोअरवर सर्वाधिक धमाल कोण करतं? असं दोघांनाही विचारण्यात आलं. यावेळी अनुष्काने विराटकडे बोट दाखवलं. ती म्हणाली, “विराटला गाणी गाणं आणि डान्स करण खूप आवडतं”. त्यानंतर विराटनेही उत्तर दिलं.
आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…
विराटने या प्रश्नाचं उत्तर देताच सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. विराट म्हणाला, “जेव्हा मी दारू प्यायचो तेव्हा डान्स फ्लोअरवर मीच असायचो. आता मी दारू पित नाही. पण मी याआधी कोणत्याही पार्टीमध्ये गेलो की दारू प्यायल्यानंतर डान्स करायचो. त्यादरम्यान मी कोणताच विचार केला नाही. या सगळ्या खूप आधीच्या गोष्टी आहेत. आता असं काहीच राहीलं नाही”.
तसेच तुमच्या दोघांचा असा कोणता मित्र आहे ज्याला तुम्ही रात्री तीन वाजतही फोन करू शकता? असा प्रश्नही विराट-अनुष्काला विचारण्यात आला. यावेळी अनुष्का म्हणाली, “तीन वाजेपर्यत आमच्या दोघांपैकी कोणी जागं असेल तर आम्ही एकमेकांना फोन करतो. पण आता आम्ही तीन वाजेपर्यंत जागं राहतच नाही. रात्री ९.३० वाजेपर्यंतच आम्ही दोघं झोपतो”. विराट-अनुष्का सध्या त्यांचं पालकत्व एण्जॉय करताना दिसत आहेत.