बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आज आघाडीचा स्टार म्हणून ओळखला जातो. कधी दीपिकाबरोबर तर कधी फॅशनमुळे तो चर्चेत असतो. रणवीरचा बिनधास्तपणा भावतो. नुकताच त्याचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याबरोबरीने अर्जुन कपूर, आयुष्यमान खुराणा, मनीष पॉलदेखील दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग त्याच्याबरोबरचे हे कलाकार गोविंदाचा डान्स बघत आहेत. गोविंदा आपल्या नेहमीच्या शैलीत डान्स करताना दिसत आहे. इतर कलाकार, प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत. गोविंदाचा डान्स संपताच रणवीरने थेट स्टेज गाठले. त्याच्याबरोबरीने इतर कलाकारदेखील आले, मात्र रणवीर स्टेजवर येताच त्याने गोविंदाला साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या या कृतीमुळे गोविंदादेखील भावुक झाला. फिल्मफेअरच्या कार्यक्रमात हा प्रसंग घडला.
तितिक्षा तावडेने केलं ‘दृश्यम २’ अभिनेत्याचं कौतुक; म्हणाली “तू खूप मेहनत…”
नव्व्दच्या दशकांत गोविंदाने आपल्या डान्सने तमाम प्रेक्षकांना वेड लावलं होत. ‘आँखे’, ‘स्वर्ग’, ‘हाथकडी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘कुली नंबर १’, यांसारखे सुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत. २००६ साली आलेल्या ‘पार्टन’र चित्रपटामुळे त्याने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवून दिली. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याबरोबर त्याने अनेक चित्रपटात काम केले.
रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तो आणि आलिया भट्ट ‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत.