भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी जगभरात लोकप्रिय आहे. २०१३ मध्ये एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीनिमित्त दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांचे चाहते त्यांना ‘विरुष्का’ असंही संबोधतात. काही महिन्यांपूर्वी विराट-अनुष्काने जोडीने ‘प्युमा’च्या एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिने विराटशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचं मजेशीर कारण सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट-अनुष्काला या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी अभिनेत्रीने भर कार्यक्रमात विराटची स्मरणशक्ती अतिशय चांगली असून आम्ही डेट करत असताना त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या ते सांगितलं होतं. अनुष्का म्हणाली होती, “जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायचो तेव्हा विराट काहीच विसरायचा नाही. एकीकडे मी खूपच विसरभोळी आहे पण, दुसरीकडे त्याला अनेक वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा अचूक लक्षात असतात. त्याची स्मरणशक्ती पाहून मी खरंच प्रभावित झाले होते. तेव्हाच ठरवलं ‘यार, ये तो लाइफ पार्टनर ही अच्छा है’ (तो एक उत्तम जोडीदार आहे.) त्याचे हे सगळे गुण मला प्रचंड आवडायचे शेवटी त्यानंतर आमचं लग्न झालं.”

“मी माझा फोन विसरते, घरातील गोष्टींबद्दल मला काहीच माहित नसतं. पण, मी माझ्या मुलीबद्दल एकही गोष्ट विसरत नाही. माझी स्मरणशक्ती फक्त माझ्या मुलीसाठी चांगलीये… बाकी सगळ्या गोष्टी विराटला माहिती असतात. खरंतर वृश्चिक राशीची माणसं कधीच काही विसरत नाहीत. याला आता ३ हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा आठवतील.” असं अनुष्काने सांगितलं. तिचा खुलासा ऐकून उपस्थित सगळेजण हसू लागले होते.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : अर्जुनच्या वाढदिवसामुळे निर्माण होणार नवीन गोंधळ, काय असेल साक्षी शिखरेचा पुढचा डाव? पाहा प्रोमो…

विराट-अनुष्काला या मुलाखतीदरम्यान विविध टास्क देण्यात आले होते. यावेळी अनुष्का शर्माला तिच्या कोणत्याही चित्रपटातील फेमस डायलॉग अर्धा बोलून, पुढचा डायलॉग विराट कोहलीच्या लक्षात आहे का? हे पाहण्यास सांगितलं होतं. यावर अनुष्काने तिच्या ‘बँड बाजा बारात’ चित्रपटातील- “प्यार व्यापार की जोडी कभी नही बैठती, ना भाई मै तो सिंगल ही बेस्ट हूं,” हा डायलॉग म्हणून दाखवला आणि पुढचा डायलॉग विराटला पूर्ण करण्यास सांगितलं.

हेही वाचा : मराठी अप्सरेचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण! मल्याळम सुपरस्टारसह शेअर करणार स्क्रीन, पाहा पहिली झलक

अनुष्काच्या एवढ्या जुन्या चित्रपटातील डायलॉग विराटच्या लक्षात नसेल असा प्रेक्षकांचा समज होता, परंतु विराटने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. “बिझनेस कर ले मेरे साथ. ब्रेड पकोडे की कसम, कभी धोखा नही दूंगा.” हा पुढचा डायलॉग जसाच्या तसा ऐकल्यावर अनुष्का देखील थक्क झाली होती. या टास्कच्या निमित्ताने उपस्थित प्रेक्षकांना विराटच्या उत्तम स्मरणशक्तीचं उदाहरण लाइव्ह पाहायला मिळालं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat anushka marriage anniversary when anushka sharma realised that virat kohli is a good life partner sva 00