भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे सेलिब्रिटी कपल मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर एकत्र दिसले. विराट कोहली अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाहून परतून वृंदावनमध्ये एकत्र दिसले होते. आता ते मुंबईत येऊन गेट वे ऑफ इंडिया येथे एकत्र दिसले आहेत. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ते त्यांच्या लक्झरी कारमधून उतरत जेट्टीकडे जाताना दिसले.
यावेळी अनुष्काने निळ्या रंगाचा ओव्हरसाइज्ड शर्ट, काळ्या शॉर्ट्स आणि गुलाबी फ्लॅट्स असा कॅज्युअल पण आकर्षक लूक केला होता. विराटने काळी जीन्स आणि काळ टीशर्ट आणि डोक्यावर काळी आणि पांढरी टोपी असा साधा लूक केला होता. विराट याच व्हिडीओत अनुष्काची हॅन्डबॅग स्वतः आपल्या हातात घेत पुढे जाताना दिसला. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये विराट अनुष्काच्या खांद्यावर हात ठेवून स्पीडबोट येण्याची वाट पाहताना दिसला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बोटीची वाट पाहत असताना त्यांच्या मागे एक मुलगी आणि मुलगा उभे होते. यातील मुलीने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला पाहिल्यावर तिची रिअॅक्शन व्हायरल होत आहे.
एका व्हिडीओत विराट अनुष्का त्यांच्या बोटीची वाट पाहत उभे असताना त्यांच्या मागे उभी असलेली मुलगी त्यांना बघते. सुरुवातीला तिला त्यांना ओळखता येत नाही. त्यांनतर ती तिच्या मित्राशी नीट बोलून पुन्हा एकदा विराट आणि अनुष्काला एकत्र बघते त्यानंतर मात्र ते दोघे विराट आणि अनुष्काचं आहे हे समजल्यावर तिची रिअॅक्शन व्हायरल होते. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विराट अनुष्का शर्मापेक्षा त्या कपलचीच चर्चा आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “असा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल?” तर दुसऱ्याने लिहिले, “या रीलची स्टार ती मुलगी आहे आणि तिची विराट कोहलीला बघून जाणवणारी उत्सुकता आहे.”
पाहा व्हिडीओ –
विराट आणि अनुष्का यांनी नुकतीच प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या मुलांसह, महाराजांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट महाराजांना हात जोडून अभिवादन करताना, जमिनीवर बसून त्यांचे विचार ऐकताना दिसले. अनुष्काने महाराजांशी संवाद साधताना सांगितले की, ती नेहमी त्यांचे आध्यात्मिक प्रवचन ऐकते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा २०१३ साली एका जाहिरातीच्या शूटदरम्यान भेटले आणि त्यांनी आपले नाते खासगी ठेवले. २०१७ साली त्यांनी इटलीमध्ये लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलीला, वामिकाला जन्म दिला, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्यांच्या दुसऱ्या बाळाचा अकायचा जन्म झाला.
अनुष्काने काही काळ तिच्या कामातून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती ‘चकदा एक्सप्रेस’ या क्रिकेटर दिग्गज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित बायोपिकद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.