भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी जगभरात लोकप्रिय आहे. विराट-अनुष्का सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दोघांचेही मुंबईतील जुहू परिसरात आलिशान घर आहे मात्र, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणे विरुष्कालाही अलिबागची भुरळ पडली आहे. या जोडप्याने अलिबागमध्ये समुद्रकिनारपट्टीच्या बाजूला नवीन जागा खरेदी केल्याचे वृत्त ‘इ-टाइम्स’ने दिले आहे.

हेही वाचा : “…तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं”, चिन्मय मांडलेकरने सांगितला किस्सा; म्हणाला, “महाराजांची भूमिका साकारणे…”

Kevin Pietersen is available to become the batting coach of the Team India his post viral on social media
Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार

मुंबईपासून प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे असल्याने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी अलिबागमध्ये प्रशस्त जागा घेऊन आलिशान घरे बांधली आहेत. शाहरुख खान, रणवीर-दीपिका, राहुल खन्ना, अनिता श्रॉफ अशा बऱ्याच सेलिब्रिटींची अलिबागमध्ये घरं आहेत. विराट-अनुष्कानेही यापूर्वी अलिबागमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु, सध्या दोघेही नव्या प्रोजेक्टची पाहणी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : “कॉलेजमध्ये प्रचंड खोडकर, नॉनसेन्स अन्…”, समीर वानखेडेंनी केला क्रांती रेडकरबद्दल खुलासा; म्हणाले, “मला राग…”

विराट अनुष्का १३ ऑगस्टला अलिबाग दौऱ्यावर गेले होते. अलिबागमधील झिराड गाव येथे या जोडप्याचे नवीन फार्महाऊस तयार होणार आहे. ‘इ-टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार तब्बल २० हजार चौरस फूट जागेवर हे फार्महाऊस उभारण्यात येणार आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये २.५४ एकर आणि ४.९१ एकर अशा दोन स्वतंत्र जमीन खरेदी केल्या आहेत. या संपूर्ण प्लॉटची किंमत एकूण १९.२४ कोटी रुपये एवढी आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत याचे बांधकाम पूर्ण होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : “२० वर्षे एकच मोबाइल फोन…”, पंकज त्रिपाठींनी वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा; म्हणाले, “मी व्हॉट्सॲप…”

दरम्यान, दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, विराट कोहली सध्या आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. तसेच अनुष्का शर्मा लवकरच ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटातून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये अभिनेत्री भारतीय गोलंदाज झुल्लन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे.

Story img Loader