क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोघांच्याही घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अनुष्काने १५ फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव या जोडप्याने अकाय असं ठेवलं आहे. तीन वर्षीय वामिका आता मोठी बहीण झाली आहे. विराट व अनुष्काची अपत्ये वामिका व अकाय या नावांचं या जोडप्याच्या नावाशी खास कनेक्शन आहे.
अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलांची नाव उत्तमरित्या निवडली आहेत. या नावांचा त्यांच्या स्वतःच्या नावांशी खास संबंध आहे. त्यांच्या मुलीचे नाव वामिका हे विराटच्या अक्षराने सुरू होते. म्हणजेच V पासून आणि त्यांच्या मुलाचे नाव अकाय हे अनुष्काच्या A पासून सुरू होते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलं…
अकाय व वामिका नावांचे अर्थ काय?
हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’ असा होतो. ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. याशिवाय तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र असा होतो. तर, वामिका हे दुर्गा देवीचे दुसरे नाव आहे. देवीच्या नावावरून विराट व अनुष्काने लेकीचं नाव वामिका ठेवलं होतं.
विराट कोहली-अनुष्का शर्माने चिमुकल्या लेकाचं नाव ठेवलं ‘अकाय’; अर्थ आहे खूपच खास, जाणून घ्या…
अनुष्का-विराटच्या लग्नाला झाली सहा वर्षे
दरम्यान, विराट व अनुष्काने काही वर्षे डेटिंग केल्यानंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर तीन वर्षांनी ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांनी मुलगी वामिकाचं स्वागत केलं होतं. त्यानंतर आता तीन वर्षांनी ते दुसऱ्यांदा पालक झाले आणि त्यांच्या घरी अकायचं आगमन झालं.
अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘चकडा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित आहे. ती शेवटची २०१८ मध्ये आनंद एल राय यांच्या रोमँटिक ड्रामा ‘झिरो’मध्ये झळकली होती.