क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतेच उत्तराखंडला जाऊन आले आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जुहूमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी हाय टाइड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हा फ्लॅट जुहू समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे. त्यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधून अथांग पसरलेला समुद्र दिसतो.

Zapkey.com ने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने १,६५० स्क्वेअर फूट फ्लॅटचा भाडेकरार केला आहे. त्यासाठी ७.५० लाख रुपये दिले आहेत. १७ ऑक्टोबरलाच घराचा भाडेकरार निश्चित झाला. विराट-अनुष्काने घेतलेल्या फ्लॅटचे भाडे महिन्याला २.७६ लाख आहे. या फ्लॅटसोबत दोन अंडरग्राउंड पार्किंग सुविधाही उपलब्ध आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अपार्टमेंट क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर आणि माजी क्रिकेटपटू समरजित सिंग गायकवाड यांचं आहे. गायकवाड हे बडोद्याच्या राजघराण्याचे वंशज आहेत.

विराट-अनुष्काने जुहूमध्ये नवीन फ्लॅट भाड्याने घेतला आहे, पण त्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी कधी जाणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच उत्तराखंडला फिरण्यासाठी गेले होते. दोघांनी तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघेही उत्तराखंडमधील नीम करोली बाबाच्या आश्रमातही गेले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर दोघेही नैनितालच्या कैंचीधामला पोहोचले. तिथे त्यांनी चाहत्यांबरोबर फोटोही काढले.

Story img Loader